सासष्टी कुणाची? आपची की काँग्रेसची?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 04:14 PM2019-04-02T16:14:56+5:302019-04-02T16:15:06+5:30

आतार्पयत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरविणारा सासष्टी तालुका यावेळी कुणाच्या बाजूने राहील? काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांच्याबाजुने की त्यांचा कल आपचे एल्वीस गोमीस यांच्याबाजूने झुकणार? दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सध्या दक्षिण गोव्यात या चर्चेने पुन्हा उचल घेतली आहे.

SALCETE IS WITH WHOM? AAP OR CONGRESS? | सासष्टी कुणाची? आपची की काँग्रेसची?

सासष्टी कुणाची? आपची की काँग्रेसची?

Next

- सुशांत  कुंकळयेकर

मडगाव: गोव्यातील आघाडीचे राजकीय विश्र्लेषक म्हणून ओळखले जाणारे अॅड. राधाराव ग्रासियस यांनी मागच्या आठवडय़ात आपल्या फेसबुकवर सध्याच्या दक्षिण गोव्याच्या राजकीय परिस्थितीविषयी अचुक भाष्य केले होते. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते, ‘जर दक्षिण गोवा लोकसभा निवडणूकीत आप पक्ष जर आपली अनामत रक्कम राखू शकला तर या मतदारसंघातून काँग्रेसचा पराभव निश्र्चित आहे.’


आतार्पयत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरविणारा सासष्टी तालुका यावेळी कुणाच्या बाजूने राहील? काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांच्याबाजुने की त्यांचा कल आपचे एल्वीस गोमीस यांच्याबाजूने झुकणार? दोन्ही उमेदवारांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सध्या दक्षिण गोव्यात या चर्चेने पुन्हा उचल घेतली आहे.


वास्तविक दक्षिण गोव्यातील 20 विधानसभा मतदारसंघात सासष्टी तालुक्याच्या केवळ आठ मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी फक्त सहा मतदारसंघ ािस्ती बहुल्य आहेत. असे असतानाही दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल सासष्टीचेच दोन लाख मतदार ठरवितात असे म्हणतात, कारण आजर्पयत ही एकगठ्ठा मते काँग्रेस पक्षाला पडत होती. पण आता आपसारखा पर्याय रिंगणात असल्याने काँग्रेसला हा आपला पारंपारीक गड सांभाळून ठेवणो शक्य होणार आहे का? कारण ज्या ज्यावेळी काँग्रेसची या तालुक्यातील मते दुस:या पक्षांना विभागून गेली आहेत त्या त्यावेळी काँग्रेसला दक्षिण गोव्यातून पराभव स्विकारावा लागला आहे. अशी दोनवेळा काँग्रेसवर परिस्थिती आली आहे हा आजवरचा इतिहास आहे.


मंगळवारी उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी सासष्टी काँग्रेसबरोबरच राहील असा विश्र्वास व्यक्त केला. आठपैकी सहा मतदारसंघात काँग्रेसचेच आमदार आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, यापूर्वी तीनवेळा मी लोकसभेवर निवडून गेलो आहे. त्या तिन्हीवेळी सासष्टीच्या मतदारांना मी जी आश्र्वासने दिली होती ती पूर्ण केली आहेत. त्यामुळे सासष्टीचे मतदार काँग्रेसबरोबरच राहतील असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.


याउलट आपचे एल्वीस गोमीस म्हणाले, यंदाची ही निवडणूक बदल घडवुन आणणारी आहे. गोव्यात जी राजकीय बजबजपुरी माजली आहे त्याला काँग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष कारणीभूत आहेत. त्यामुळे गोव्यातील जनता पर्याय म्हणून आपकडे पहात आहे. फक्त सासष्टीतच नव्हे तर गोव्यात इतरत्रही आप चांगली मते मिळवणार असे ते म्हणाले.

Web Title: SALCETE IS WITH WHOM? AAP OR CONGRESS?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा