लाखोंच्या भूखंडांची कवडीमोलाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:30 AM2017-07-21T02:30:16+5:302017-07-21T02:34:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : सेरुला कोमुनिदाद घोटाळ्यानंतर आता कोलवाळ कोमुनिदाद भूखंड घोटाळा उघडकीस आला असून कोमुनिदादने सर्व्हे क्रमांक

Sale of millions of plots | लाखोंच्या भूखंडांची कवडीमोलाने विक्री

लाखोंच्या भूखंडांची कवडीमोलाने विक्री

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : सेरुला कोमुनिदाद घोटाळ्यानंतर आता कोलवाळ कोमुनिदाद भूखंड घोटाळा उघडकीस आला असून कोमुनिदादने सर्व्हे क्रमांक ४३३/० मधील १३३ भूखंड अवघ्या ५० रुपये चौ. मीटर या दराने विकल्याची माहिती कॉँग्रेसचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी सभागृहात दिली. हा घोटाळा असल्याचे मान्य करून महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
कोलवाळ कोमुनिदादचा हा उघडकीस आलेला घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचे संकेत मिळत आहेत; कारण हजारो रुपये प्रति चौ. मीटर जमिनीचा दर असलेल्या या भागात कोमुनिदादने अवघ्या ५० रुपये प्रति चौ. मीटर दराने भूखंड विकले आहेत. एक भूखंड ३०० चौ. मीटरचा असून एकूण १३३ भूखंड बनवून ते लाटण्यात आले. बहुतेक भूखंड बिगर गोमंतकीयांनी घेतले आहेत. विक्री करण्यात आलेल्या भूखंडांवर आतापर्यंत १० बंगले उभे राहिले आहेत. याचाच अर्थ हे भूखंड बेकायदेशीररीत्या कोमुनिदाद संहितेचे उल्लंघन करून धनदांडग्यांना विकले गेले आहेत. मोठ्या भ्रष्टाचाराशवाय या हरकती करणे अशक्य असल्याचा दावा हळर्णकर व इतर कॉँग्रेस सदस्यांनी केला आहे.
हळर्णकर यांनी विचारलेल्या या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना खंवटे यांनी, या ठिकाणी उभारण्यात आलेले बंगले हे सरकारी परवानगी घेऊन बांधण्यात आलेले नाहीत, असे सांगितले. तसेच सरकारकडे या प्रकरणात अद्याप तक्रार आली नसल्यामुळे कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु परवानगी न घेता भूखंडांची विक्री करण्यात आली आणि त्या ठिकाणी बंगले बांधण्यात आले याची माहिती जर कोमुनिदाद प्रशासकाला मिळू शकते तर त्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी विचारला.

Web Title: Sale of millions of plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.