साळगावकर बंधूंची अटकपूर्वसाठी धाव
By admin | Published: August 28, 2015 02:46 AM2015-08-28T02:46:02+5:302015-08-28T02:46:03+5:30
पणजी : खनिज घोटाळा प्रकरणातही तपासाला वेग आल्यामुळे लुईस बर्जर प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही धरपकड होण्याची शक्यता लक्षात घेऊन समीर साळगावकर
पणजी : खनिज घोटाळा प्रकरणातही तपासाला वेग आल्यामुळे लुईस
बर्जर प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही धरपकड होण्याची शक्यता लक्षात
घेऊन समीर साळगावकर व
अर्जून साळगावकर यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली आहे.
सांगे येथील आश्ने डोंगर खाण प्रकरणात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरसंबंधी एसआयटीचा तपास जोरात सुरू आहे. या प्रकरणात या घोटाळ्यात अडकलेल्या मेसर्स
कांतीलाल अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असलेले उद्योजक
समीर साळगावकर व अर्जून साळगावकर
या बंधूंना एसआयटीकडून २६ आॅगस्ट
रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी
समन्स बजावले होते; परंतु त्यांनी
त्यासाठी असमर्थता व्यक्त करताना
सोमवारी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे आपल्या वकिलांतर्फे
कळविले होते.
त्यापूर्वीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. पणजी विशेष न्यायालयात त्यांनी अर्ज केला असून एसआयटीला या प्रकरणात नोटीस पाठविण्यात आली आहे.
शुक्रवारी या प्रकरणात सुनावणी होणार आहे. सोमवारी चौकशीसाठी आल्यास एसआयटीकडून अटक होण्याची शक्यता वाटल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
(प्रतिनिधी)