समीरचे होते मलगोंडा पाटीलशी संबंध
By Admin | Published: September 17, 2015 03:22 AM2015-09-17T03:22:01+5:302015-09-17T03:22:11+5:30
मडगाव : कॉ. गोंविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड याचा मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याचा
मडगाव : कॉ. गोंविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड याचा मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याचा आरोप झालेला सनातनचा साधक मलगोंडा पाटील याच्याशी संबंध होता, हे तपासात स्पष्ट झाले आहे.
मलगोंडा पाटील याच्याशी समीरचे मित्रत्वाचे संबंध होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मलगोंडा हा मडगावातील स्फोटाचा मास्टर माइंड होता, असा एनआयएचा दावा होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, समीरचा गेल्या आठ वर्षांपासून सनातन संस्थेशी संबंध होता. त्याची पत्नीही सनातनची साधक असून गोव्याच्या आश्रमात ती राहात असे. मलगोंडा पाटील याचा आॅक्टोबर २00९ मध्ये मडगावात दिवाळीच्या पूर्वसंध्येस झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कारस्थानात हात होता, असा या प्रकरणात तपास करणाऱ्या एनआयएचा दावा होता. त्या स्फोटात मलगोंडासह अन्य एक सनातनशी संबंध असलेली व्यक्ती ठार झाली होती. या प्रकरणात नंतर एनआयएने सनातनशी संबंध असलेल्या नऊ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, तांत्रिक कारणासाठी तसेच पुराव्याअभावी ते सर्व निर्दोष मुक्त झाले होते.
या ताज्या घडामोडीनंतर फोंड्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या तरी फोंडा पोलीस यासंबंधी कसलाही तपास करीत
नसून महाराष्ट्राच्या पोलिसांनीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)