सनातनचा रुद्र पाटील मोस्ट वाँटेड

By admin | Published: September 22, 2015 12:44 AM2015-09-22T00:44:52+5:302015-09-22T00:45:45+5:30

पणजी/कोल्हापूर : सनातन संस्थेचा रुद्र पाटील हा कार्यकर्ता कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मोस्ट वॉण्टेड ठरला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक पोलीसही

Sanatan's Rudra Patil Most Wanted | सनातनचा रुद्र पाटील मोस्ट वाँटेड

सनातनचा रुद्र पाटील मोस्ट वाँटेड

Next

पणजी/कोल्हापूर : सनातन संस्थेचा रुद्र पाटील हा कार्यकर्ता कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मोस्ट वॉण्टेड ठरला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक पोलीसही एनआयएच्या मदतीने युद्धपातळीवर रुद्र पाटीलचा शोध घेत आहेत. २००९ साली दिवाळी दिवशी मडगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर रुद्र पाटील हा फरार झाला होता. पोलिसांच्या राष्ट्रीय तपास पथकाला (एनआयए) तो हवा आहे.
एसआयटीचे पूर्ण लक्ष आता सनातनच्या काही साधकांवर केंद्रित झाले आहे. पानसरेंच्या हत्येप्रकरणी चौकशी करत असलेल्या एसआयटीचा सनातनच्या दोन साधकांवर मुख्य संशय आहे. मडगावमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडल्यापासून रुद्र पाटील व सारंग अकोलकर हे दोघेही फरारी आहेत. मडगावमधील बॉम्बस्फोटात मलगोंडा पाटील व योगेश नाईक या दोघा साधकांचा मृत्यू झाला होता. त्यांनी स्कुटरमधून स्फोटके आणली होती व १६ आॅक्टोबर २००९ रोजी मडगावमध्ये त्यांचा स्फोट झाला होता.
गेल्या आठवड्यात पानसरे खूनप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड यास अटक करण्यात आली आहे. त्या शिवाय मुंबईतील एकास व कर्नाटकमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. रुद्र पाटील हा मलगोंडा पाटीलचा जवळचा नातेवाईक आहे. रुद्र हा फरार असला, तरी समीर गायकवाड हा कायम रुद्रच्या संपर्कात होता, असे कॉल डेटा रेकॉर्डवरून एसआयटीला आढळून आले आहे. रुद्र पाटील हा कर्नाटकमधील असल्याने कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाशीही त्याचा संबंध असावा, असा पोलिसांचा कयास आहे. रुद्र पाटील व समीर गायकवाड या दोघांनीही पानसरे यांच्या हत्येपूर्वी एक महिना अगोदर कोल्हापूर येथील पानसरे कुटुंबीयांच्या निवासस्थानाच्या परिसराची पाहणी केली होती. एसआयटीकडून यापुढे लवकरच याबाबतची अधिक तपशीलवार अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
रुद्रची पत्नी प्रीती पाटील व्यवसायाने वकील असून त्यांनी समीर गायकवाड यांच्यावतीने
युक्तिवाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रुद्र व सारंग अकोलकर यास एनआयएने
यापूर्वीच फरार घोषित केलेले आहे.
दरम्यान, सनातनचे प्रवर्तक अभय वर्तक
यांच्या मते रुद्र हा निर्दोष आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sanatan's Rudra Patil Most Wanted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.