वाळू उपसा होडी व्यावसायिक मुख्यमंत्र्यांच्या दारी एका महिन्यात समस्या साेडवा - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 06:43 PM2024-01-10T18:43:04+5:302024-01-10T18:43:15+5:30
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रकांना राज्यात यायला पास काढून कायदेशीर परवानगी दिली आहे.
नारायण गावस
पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रातून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक व्यावसायिकांच्या समस्या सोडविल्या पण आमच्या होड्या बंद आहेत. मुख्यमंत्र्यांनी आमच्या होड्याही लवकर सुरु कराव्या या मागणीसाठी राज्यातील वाळू उपसा करणाऱ्या होडी व्यावसायिकांनी पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकरांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना १ महिन्याच्या आत तुमचा प्रश्न साेडवू असे आश्वासन दिले आहे.
आमच्या हाेड्या महाराष्ट्रात घ्याव्या
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून वाळू वाहतूक करणारे ट्रकांना राज्यात यायला पास काढून कायदेशीर परवानगी दिली आहे. तसेच आता राज्यातील वाळू काढणाऱ्या होड्यांना महाराष्ट्रात घ्यावे. या ट्रक वाल्यांचे अनेक ट्रक आहेत. पण या व्यावसायिकांची एकची होडी आहे ती चालवून हे लाेक आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात आता होड्या बंद असल्याने त्यांनी कुटुंबाचे पोषण कसे करायचे असा प्रश्न या लोकांसमारे आहे. सरकारने एकतर हा वाळू व्यावसाय राज्यात कायदेशीर करावा अशी मागणी आमदार प्रविण आर्लेकर यांनी केली.
पेडणे मतदारसंघात ७५ टक्के वाळू उपसा करणारे होडी व्यावसायिक आहेत. एकूण १५० होड्या आहेत. पण आम्हाला वाळू काढायला दिली जात नाही. न्यायालयाने बंदी घातली आहे. जर या महाराष्ट्रातून ट्रक बेकायदेशीर गाेव्यात वाळू आणू शकतात मग आमच्या होड्या बंद का? या हाेड्या महाराष्ट्रात वाळू काढण्यासाठी वापराव्यात. वाळू ट्रक चालकांच्या समस्या घेऊन आमदार जीत आरोलकर मुख्यमंत्र्यांकडे गेले पण यावेळी त्यांनी आमचे आमदार प्रविण आर्लेकरांना विश्वासात घेतले नाही. ट्रक चालकांकडून काहीतरी कमीशन मिळते म्हणून आमदार आराेलकरांनी हा पुढाकर घेतला आहे, असा आरोप वाळू उपसा करणाऱ्या होडी व्यावसायिकांनी केला.