खाण मुद्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ

By admin | Published: August 10, 2016 05:48 PM2016-08-10T17:48:56+5:302016-08-10T17:48:56+5:30

भाजप आमदार परप्रांतिय कंत्राटदारांना खाण उद्योगासाठी गोव्यात आणतात आणि त्यांना गोमंतकियांसाठी केलेल्या योजनांचा लाभ मिळवून देतात असा आरोप आमदार विजय सरदेसाई

The scandal in the Goa Legislative Assembly on the issue of mining scam | खाण मुद्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ

खाण मुद्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ

Next
>ऑनलाइन लोकमत,
 
पणजी,दि.10 - भाजप आमदार परप्रांतिय कंत्राटदारांना खाण उद्योगासाठी गोव्यात आणतात आणि त्यांना गोमंतकियांसाठी केलेल्या योजनांचा लाभ मिळवून देतात असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत गदारोळ झाला. बेकायदेशीर खाण उद्योगात भाजपचे आमदार असल्याचा आरोपही सदरेसाई यांनी केला. 
 या योजनेच्या लाभार्थ्यांची नावे सांगण्यास सरदेसाई यांनी सांगितली. काही लाभार्थ्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी वाचली त्यात फळदेसाई आडनाव असलेल्या नावाचा उल्लेख होता. हा कोणत्या आमदाराचा नातेवाईक आहे सांगू का असे सरदेसाई यांनी तीनवेळा विचारले आणि तिथेच गोंधळ सुरू झाला.  सत्ताधारी सदस्यांनी जोरदार हरकत घेतली. 
सरदेसाई यांच्या वक्तव्याला भाजप आमदार निलेश काब्राल, सुभाष फळदेसाई आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आक्षेप घेतला. त्यांचे आरोप कामकाजातून वगळण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर ते आरोप कामगाजातून वगळण्यात आल्याचे सभापती अनंत शेट यांनी सांगितले. परंतु हेच आरोप त्यांनी तीन वेळा केले. दोनवेळा ते वगळण्यात आल्याचे सभापतींनी जाहीर केले, परंतु तिसºयावेळी करण्यात आलेले आरोप कामकाजातून न वगळताच पुढील प्रश्नांसाठी सूचना केली. त्यामुळे आरोप कामकाजात राहिले. 
 खाण बंदीनंतर मशिनरी मालकांसाठी केलेल्या योजनेत त्रुटी असल्यामुळे त्याचा लाभ बिगर गोमंतकियांनी घेतल्याचा दावा सरदेसाई यांनी केल्विधानसभेत केला होता. अर्जदारांना आधार कार्ड आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सक्तीचे न करण्यात आल्यामुळे असे घडल्याचे त्यांनी सांगितले होते. मशिनरी मालकांना आधारकार्ड व निवडणुक आयोगाची ओळखपत्रे सक्तीची केल्यास ही योजना केवळ गोमंतकियांनाच मिळेल अशी सूचना त्यांनी केली होती. ही सूचना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मानून घेतली परंतु त्यापूर्वी सभागृहात मोठी बाचाबाची झाली. सभात्याग करण्यासाठी ते सभागृहातून चालायलाही लागले परंतु नंतर दिगंबर कामत यांनी त्यांचा प्रश्न उचलून धरल्यामुळे मागे फिरले.

Web Title: The scandal in the Goa Legislative Assembly on the issue of mining scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.