राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
By समीर नाईक | Published: October 9, 2023 07:16 PM2023-10-09T19:16:34+5:302023-10-09T19:18:15+5:30
पाहा, क्रीडा प्रकारांचे सविस्तर वेळापत्रक
समीर नाईक, पणजी: राज्यात २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन असले तरी १९ ऑक्टोबरपासून काही सामन्यांना सुरुवात होणार आहे. या अनुषगांने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बॅडमिंटन खेळाने १९ ऑक्टोबरपासून ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील क्रीडाप्रकाराना सुरूवात होत आहे. बॅडमिंटनसोबत रग्बी, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅन्काक सिलाट, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, मॉर्डन पँटाथ्लॉन आणि बास्केटबॉल स्पर्धेच्या आयोजनाला उद्घाटनापूर्वी सुरूवात होणार आहे.
क्रीडा प्रकारांचे सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे.
ताळगाव डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम : बॅडमिंटन १९ ते २४ ऑक्टोबर, फॅन्सिंग २६ ते ३० ऑक्टोबर, आणि व्हॉलीबॉल १ ते ५ नोव्हेंबर.
बांबोळी, ॲथलेटिक स्टेडियम : रग्बी २५ ते २७ ऑक्टोबर आणि ॲथलेटिक्स २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर.
हवाई बीच दोनापावल : रोविंग आणि यॉटिंग ३ ते ८ नोव्हेंबर.
करंझाळे मिरामार रोड : ट्रायथ्लोन ४ ते ७ नोव्हेंबर.
मिरामार बीच/ वार्का बीच : बीच हँडबॉल २ ते ६ नोव्हेंबर, बीच व्हॉलीबॉल ४ ते ७ नोव्हेंबर, आणि मिनी गोल्फ १ ते ३ नोव्हेंबर.
कांपाल इनडोअर स्टेडियम : नेटबॉल २२ ते २७ ऑक्टोबर, टेबलटेनिस ३ ते ७ नोव्हेंबर, कबड्डी ४ ते ८ नोव्हेंबर.
जलतरण संकुल कांपाल : जलतरण २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.
कांपाल क्रीडा ग्राम : वेटलिफ्टिंग २५ ते २९ ऑक्टोबर, वुशू १ ते ४ नोव्हेंबर, ज्युडो ६ ते ८ नोव्हेंबर, पॅन्काक सिलाट २६ ते २९ ऑक्टोबर, गटका ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, योगासन ५ ते ९ नोव्हेंबर, मल्लखांब २६ ते २८ ऑक्टोबर, कुस्ती ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, लगोरी ५ ते ६ नोव्हेंबर, कलारीपय्याटू ७ व ८ नोव्हेंबर.
शापोरा नदी : रोविंग २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर, कॅनोईंग व कायाकिंग ३ ते ६ नोव्हेंबर.
पेडे बहुउद्देशीय इनडोअर हॉल : जिम्नॅस्टिक्स २३ ते २८ ऑक्टोबर, बॉक्सिंग १ ते ८ नोव्हेंबर, बिलियर्ड्स अँड स्नूकर २७ ते ३० ऑक्टोबर.
हॉकी मैदान पेडे : हॉकी ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर.
मांद्रे यश शूटिंग अकादमी : शूटिंग २ ते ९ नोव्हेंबर.
फोंडा क्रीडा संकुल : मॉर्डन पँटाथ्लॉन २६ ते २९ ऑक्टोबर, तायक्वांदो ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, खो-खो ४ ते ८ नोव्हेंबर. अभियांत्रिकी कॉलेज फर्मागुडी : तिरंदाजी २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.
फातोर्डा पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियम: फुटबॉल (पुरूष) ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर.
बहुउद्देशीय मैदान, फातोर्डा: लॉन टेनिस ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर.
इनडोअर हॉल, फातोर्डा: सॅपेकटॅकरो ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, आणि स्क्वे मार्शल आर्ट ६ ते ८ नोव्हेंबर.
मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, नावेली : बास्केटबॉल २३ ते २८ ऑक्टोबर, रोलबॉल ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, हँडबॉल ४ ते ८ नोव्हेंबर.
कोलवा बीच : बीच फुटबॉल २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर.
वेर्णा बिर्ला बायपास एअरपोर्ट रोड : सायकलिंग रोड रेस ८ ते ९ नोव्हेंबर.
चिखली मल्टिपर्पझ स्टेडियम: लॉन बॉल्स १ ते ८ नोव्हेंबर.
चिखली स्क्वॉश फॅसिलिटी: स्क्वॉश १ ते ५ नोव्हेंबर.
टिळक फुटबॉल मैदान, वास्को: फुटबॉल (महिला).
दिल्ली गोफ क्लब : गोल्फ ५ ते ९ नोव्हेंबर.
इंदिरा गांधी स्टेडियम संकुल, दिल्ली: सायकलिंग ट्रॅक रेस २ ते ५ नोव्हेंबर.