औद्याेगिक वसाहतींच्या जागाही बिल्डरांना विकण्याचा डाव; गोवा फॉरवर्डचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 02:50 PM2023-10-11T14:50:09+5:302023-10-11T14:50:45+5:30
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने नवनवीन उद्योग आणून नाेकऱ्या तयार करणे आहे. पण गाेव्यात गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नावाखाली औद्यागिक जमिनी बिल्डरांना विकल्या जात आहे.
नारायण गावस
पणजी: गोव्यातील औद्योगिक वसाहतींच्या जागाही आता बिल्डरांना विकण्याचा डाव सरकारचा आहे. जुआरी औद्योगिक वसाहतीची जागा बिल्डरांना देण्याचा डाव असून त्याला गोवा फॉरवर्डचा तिव्र विरोध असणार आहे. ही जागा बिल्डरांना न विकता या ठिकाणी अन्य सरकारचा प्रकल्प घालावा, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी बुधवारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने नवनवीन उद्योग आणून नाेकऱ्या तयार करणे आहे. पण गाेव्यात गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नावाखाली औद्यागिक जमिनी बिल्डरांना विकल्या जात आहे. या ठिकाणी माेठी बांधकामे होत आहे. याला मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्री जबाबदार आहे. आम्ही गाेव्यातील जमिनी बिल्डरांना विकायला देणार नाही. सध्या पेडण्यापासून काणकोणपर्यत सर्वच ठिकाणी माेठ्या प्रमाणात जागा विकल्या जात आहे. ४० लाख चौरस मिटर जागा मोपा पिडीएसाठी बदलली आहे. या जागेत आता माेठ्या प्रमाणात बांधकाम हाेणार आहे. प्रत्येक ठिकाणी शेतजमिनीच्या जागा बांधकामासाठी बदलल्या जात आहे. सरकारने अजूनही रिजनल प्लॅन २०२१ लागू केलेला नाही. सरकारचा गाेव्याच्या जमिनी विकायचा हेतू आहे. म्हणून मंत्री आमदार सर्वच गप्प आहे, असे यावेळी विजय सरदेसाई यांनी सांगितले.
बेरोजगारीत गोवा दुसरा
लेबर फोर्स सव्र्हे नुसार गाेव्याचा बेराेजगारी दर हा देशात दुसरा आहे. गोव्यात ९.७ टक्के बेरोजगारी दर वाढला आहे. हा बेरोजगारी दर कमी करण्यासाठी कुठलाच निर्णय घेतला जात नाही. पण गाेव्याच्या शेत जमिनी मात्र बिल्डरांना विकण्यासाठी प्रयत्न सुरु केले जात आहे .यासाठी मुख्यमंत्रया्पासून सर्व मंत्री राष्ट्रीय नेत्यांना भेटत आहे. हे मंत्री लाेकांच्या भल्यासाठी नाही तर गाेव्याच्या जमिनी कशा बाहेरील बिल्डरांना विकता येणार यासाठी चर्चा करायला जात आहे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.