मोदींच्या जाहीर सभेमुळे ६ फेब्रुवारी रोजी मडगावमधील विद्यालयांना सुट्टी जाहीर
By किशोर कुबल | Published: February 1, 2024 05:04 PM2024-02-01T17:04:32+5:302024-02-01T17:05:00+5:30
या जाहीर सभेस ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आधी जाहीर केलेले आहे.
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या मंगळवारी ६ रोजी मडगाव येथे जाहीर सभा होणार असल्याने त्या दिवशी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मडगावमधील विद्यालयांना शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केली आहे.
शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की, फक्त मडगाव शहरातीलच पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतच्या सर्व शाळा ६ रोजी बंद राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेतुल येथे ओएनजीसीच्या एका कार्यक्रमासाठी येत आहेत त्यानंतर ते मडगाव येथे जाहीर सभेसाठी येतील. विद्यालये चालू राहिल्यास वाहतुकीची कोंडी होऊ शकते. त्यामुळे मडगावमधील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. या जाहीर सभेस ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आधी जाहीर केलेले आहे.