गोव्यात येत्या १५ पासून विज्ञान चित्रपट महोत्सव; २५ हजार विद्यार्थी घेणार भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 07:59 PM2020-01-10T19:59:54+5:302020-01-10T20:01:44+5:30

कार्यशाळा, प्रदर्शने, परिसंवाद आणि मास्टर क्लासचा समावेश

Science Film Festival from 15th January in Goa; 25 thousand students will participate | गोव्यात येत्या १५ पासून विज्ञान चित्रपट महोत्सव; २५ हजार विद्यार्थी घेणार भाग

गोव्यात येत्या १५ पासून विज्ञान चित्रपट महोत्सव; २५ हजार विद्यार्थी घेणार भाग

Next

पणजी : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल प्रेम निर्माण व्हावे आणि चित्रपटांच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार व्हावा, या उद्देशाने गोव्यात पाचव्या भारतीय सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या  १५ ते  १८ जानेवारी सकाळी १0  ते संध्याकाळी ५  वाजेपर्यंत आयनॉक्स कॉम्प्लेक्स आणि मॅकेनिझ पॅलेस येथे विज्ञान परिषद, गोवा यांच्यामार्फत आयोजित होणार आहे. 

इएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी १५ रोजी सकाळी १0  वाजता उद्घाटन होणार आहे. प्रत्येक वर्षी इएसजी आणि इतर संस्था मिळून तरुण पिढीसाठी हा महोत्सव आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. महोत्सवाला मिळणाºया यशामुळे प्रत्येक वर्षी हा महोत्सव मोठा होत आहे. या महोत्सवासाठी आम्हाला शाळांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसादजबरदस्त आहे. साय - फी २0२0 ला विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभाग (गोवा शासन), विज्ञान प्रसार (डीएसटी) सरकार यांचे पाठबळ आहे.

भारत सरकार तसेच गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी), नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ), गोवा विद्यापीठ, सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन रिसोअर्स (एनआयएससीएआर) यांनीही पाठिंबा दिला आहे. 

विज्ञान परिषद गोवाचे अध्यक्ष सुहास जे गोडसे यांनी सांगितले की, यावषीर्चा चित्रपट महोत्सव नेहमीप्रमाणेच विज्ञान आणि चित्रपटांचा उत्सव आहे. विज्ञान हा एक मनोरंजक विषय आहे आणि आम्ही या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून शिक्षणातील दरी कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत. नेहमीप्रमाणे यावषीर्ही आम्ही आमच्या तरुण शास्त्रज्ञांमधील कलागुण प्रदर्शित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपट प्रदर्शित करणार आहोत. ते म्हणाले की, साय-फी २0२0 शक्य तितक्या बहुविध बनविण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही दरवर्षी हा अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत.

संपूर्ण गोव्यातील १३0 शाळांमध्ये महोत्सवापूर्वी काही उपक्रम राबवले गेले. येथे, चित्रपट निर्मितीवरील कार्यशाळेचे आयोजन केले गेले जेथे. मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनविलेले हे चित्रपट रोख बक्षिसे असलेल्या स्पर्धेच्या विभागात प्रदर्शित केले जातील.  सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेच्या मास्टर क्लासेस, पॅनेल चर्चा, भारतीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन, प्रदर्शन, कार्यशाळा आणि रोख बक्षिसे असणारी लघुपट स्पर्धा या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सिनेसृष्टी प्रेमिकांसाठी ही एक चांगली संधी आहे. 

स्क्रीनिंगसाठी निवडलेल्या चित्रपटांमध्ये मिशन मंगल (2019) 'एव्हरेस्ट' (2015), 'व्हायरस' (2019), 'टर्मिनेटर: डार्क फॅट' (2019), 'जिओस्टॉर्म' (2017) , 'अमोरी' (2019), 'ब्लेड रनर 2049' (2017) आणि 'वॉले-ई' (2008) आदींचा समावेश आहे.

शेवटच्या दिवशी, ईएसजी येथील ऑडी क्र. 2 येथे 'सोसायटीच्या दिशेने विज्ञान संप्रेषणातील आव्हाने' या विषयावर पॅनेल चर्चा होईल. समितीच्या अध्यक्षांमध्ये अमरेश चक्रवर्ती आणि सैकत यांच्यासह वैज्ञानिक डॉ. परमानंद बर्मन आणि डॉ. मेहर वान आणि शेकर रे यांचा समावेश असेल. राज्यातील २५ हजारपेक्षा जास्त लाभार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ व इतरांना चार दिवस चालणाºया या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.

Web Title: Science Film Festival from 15th January in Goa; 25 thousand students will participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.