पणजीत बुधवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 08:02 PM2019-01-15T20:02:22+5:302019-01-15T20:03:16+5:30
गोव्यात पणजीतील मॅकनीज पेलेस व आयनॉक्समध्ये होणारे सायन्स फिल्म फेस्टीवल हे १६ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात होणार असून या महोत्सवात ९ फिचर फिल्म अणि ३० फिल्म व माहितीपटांचे प्रदर्शन होईल.
पणजी - गोव्यात पणजीतील मॅकनीज पेलेस व आयनॉक्समध्ये होणारे सायन्स फिल्म फेस्टीवल हे १६ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात होणार असून या महोत्सवात ९ फिचर फिल्म अणि ३० फिल्म व माहितीपटांचे प्रदर्शन होईल. गोवा व महाराष्ट्रातील १२४ संस्थांचे उपक्रम त्यात होणार आहेत.
देशातील ६० शस्त्रज्ञ व संशेधक या महोत्सवातील विविध कार्यक्रमात रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित राहणार अहेत. समुद्राचे भविष्य, तंत्रज्ञान आणि संशोधन आणि मूलभूत विज्ञान या तीन संकल्पनांवरील फिल्म ट्रॅक्सवर आधारित चित्रपट या महोत्सवाला पाहायला मिळतील. तसेच समुद्रातले जीवन आणि अनुकूलनता, बायो- कम्युनिकेशन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व प्रदुषणाचा परिणाम आणि हवामान बदल या विषयावरही चित्रपट व माहितीपट दाखविले जाणार आहेत. हा महोत्सव विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, कार्यशाळा, फिल्म स्क्रीनिंग, प्रसिद्ध शास्त्रज्ञ व नामवंतांबरोबर चर्चा यांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. विज्ञान प्रसार चे संचालक डॉ. नकुल पराशर हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील आणि पद्मविभूषण डॉ. राजगोपाला चिदंबरम हे निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहातील. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी ही माहिती दिली.
डॉ. शेखर मांडे, प्रो. शर्मिष्ठा बॅनर्जी, डॉ. अरविंद रानडे, डॉ सुमीत के. मिश्रा, पर्यावरण विज्ञान आणि बायोमेडिकल, हे फिल्म्सवर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहातील, तर प्रो. बॅनर्जी १८ जानेवारी रोजी शिक्षकांची कार्यशाळा घेतील आणि डॉ. रानडे १८ व १९ जानेवारी रोजी टेलिस्कोप कार्यशाळा घेतील, ज्यामध्ये सहभागींना त्यांचे स्वत:चे उपकरण तयार करता येणार आहे.
फिल्म स्क्रीनिंगशिवाय फिल्म मेकिंग कार्यशाळा आणि प्रशिक्षण या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. यामुळे प्रेक्षकांना लाइव्ह प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान अधिक मजेदार व अर्थपूर्ण मागार्ने जाणून घेण्याची नवी संधी मिळेल तसेच फिल्म इंडस्ट्रीमधला त्याचा वापरही माहीत करून घेता येईल, अशी माहिती तालक यांनी दिली.