वनाधिकाऱ्यांना चकवून शिकारी पसार
By admin | Published: May 20, 2015 01:48 AM2015-05-20T01:48:18+5:302015-05-20T01:48:26+5:30
वाळपई : होंडा-वडाकडे सत्तरी येथे वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी रानडुकराचे ३ किलो मांस, ६ गावठी बॉम्ब व दोन काडतुसे जप्त केली.
वाळपई : होंडा-वडाकडे सत्तरी येथे वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी रानडुकराचे ३ किलो मांस, ६ गावठी बॉम्ब व दोन काडतुसे जप्त केली. हा मुद्देमाल ज्याच्या घरातून जप्त केला, तो शिकारी या वन अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन निसटला.
होंडा येथील मॅथ्यू फर्नांडिस हा गावठी बॉम्बद्वारे वन्य प्राण्यांची शिकार करत असल्याची माहिती प्राणीमित्र अमृत सिंग यांच्याकडून वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वाळपई वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मॅथ्यू याच्या घराची झडती घेतली असता, मांस, बॉम्ब, काडतुसे सापडली. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी मॅथ्यू यास ताब्यात घेतले. त्याला जीपमध्ये बसवले असता, मॅथ्यू याने वन अधिकाऱ्यांना गुंगारा देत जीपमधून उडी टाकली व पळ काढला. वन अधिकारी जॉन फर्नांडिस, सिद्धेश गावडे तसेच महादेव गावकर, प्रदीप गावकर, राजेंद्र पाटील यांच्या पथकाने वरील कारवाई केली. (प्रतिनिधी)