आग्वाद जेलमध्ये १ जूनपासून 'फ्रीडम मुव्हमेंट ऑफ गोवा' आणि 'फोर्टस ऑफ गोवा या दोन माहितीपटांचे स्क्रिनिंग
By समीर नाईक | Published: May 31, 2024 03:05 PM2024-05-31T15:05:10+5:302024-05-31T15:05:31+5:30
जून १ रोजी या चित्रपटगृहाचे उद्घाटन करण्यात येणार. 'फ्रीडम मुव्हमेंट ऑफ गोवा' आणि 'फोर्टस ऑफ गोवा हे दोन माहितीपट इथे दाखवले जाणार.
पणजी: सिकेरी येथील ‘आग्वाद पोर्ट आणि जेल' या ऐतिहासिक स्थळात 'द आग्वाद सिनेमा' नावाच्या चित्रपटगृहचे लवकरच लाँच करण्यात येणार. पोर्तुगीज राजवटीत कठोर शिक्षा झालेल्या कैद्यांनी तुरुंगात ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काळ कोठडीत हा चित्रपटगृह उभारण्यात येणार. गोव्याची संस्कृती आणि इतिहास दर्शविणारे दोन माहितीपट इथे दाखवले जाणार.
जून १ रोजी या चित्रपटगृहाचे उद्घाटन करण्यात येणार. 'फ्रीडम मुव्हमेंट ऑफ गोवा' आणि 'फोर्टस ऑफ गोवा हे दोन माहितीपट इथे दाखवले जाणार.
गोवा फ्रीडम मुव्हमेंट अंतर्गत पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त करण्यासाठी गोव्याच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अथक संघर्ष आणि बलिदान या माहितीपटाच्या माध्यमातून दाखविले जाणार. तर फोर्टस ऑफ गोवा अंतर्गत राज्याच्या किल्ल्यांचे सुंदर स्वरूप, प्रभावी वास्तुकला, ऐतिहासिक महत्व, गोव्याच्या इतिहासाचे रक्षण आणि आकार देण्यामधील त्यांची भूमिका हे दाखविण्यात येणार आहे.
इतिहास मनोरंजक आणि प्रवेशयोग्य बनवून, शिक्षण आणि प्रेरणा देण्यासाठी माहितीपट निवडण्यात आले आहे. अभ्यागतांनी राज्याच्या कथांबद्दल अधिक सविस्तर जाणून घ्यावे म्हणून हे माहितीपट दाखविले जाणार आहे. यातून स्थानिक लोकांसोबत पर्यटक देखील शिक्षित होणार आहे.