युतीवर शिक्कामोर्तब
By Admin | Published: February 26, 2015 02:25 AM2015-02-26T02:25:03+5:302015-02-26T02:28:34+5:30
पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि मिकी पाशेको यांचा गोवा
पणजी : येत्या १८ मार्च रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि मिकी पाशेको यांचा गोवा विकास पक्ष व सरकारमधील अपक्ष मंत्री-आमदार यांच्यात युती करण्यावर शिक्कामोर्तब
झाले आहे. मगो पक्षाला फोंडा तालुक्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत येणारे जि. पं. मतदारसंघ व इतर पाच
असे एकूण नऊ मतदारसंघ भाजपकडून सोडले जाणार आहेत.
भाजपचे काही आमदार जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी युती नको, अशी भूमिका घेत होते; पण संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी युती कायम असावी, असे ठरविले. मगो आणि गोवा विकास पक्ष आमच्यासोबत सत्तेत आहे. त्यामुळे आम्ही या दोन्ही पक्षांना घेऊन व अपक्ष मंत्री आवेर्तान फुर्तादो व आमदार बेंजामिन सिल्वा यांच्यासोबत एकत्रितरीत्या जिल्हा पंचायत निवडणूक लढवावी, असे भाजपने ठरविले. दिल्लीत मंगळवारी रात्री पर्रीकर, पार्सेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, मंत्री दयानंद मांद्रेकर यांची बैठक झाली. त्या वेळी युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मंत्री पाशेको यांच्या गोवा विकास पक्षासाठी सासष्टी तालुक्यातील नुवे व बाणावली या मतदारसंघातील तीन-चार जागा सोडल्या जातील.
भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू केली आहे. निवडून येऊ शकतील अशा कार्यकर्त्यांची यादी भाजपने बनवली आहे.
(खास प्रतिनिधी)