‘सर्च टॅलेंट पोर्टल’ पुढील महिन्यापासून - विजय गोयल

By admin | Published: October 5, 2016 07:28 PM2016-10-05T19:28:12+5:302016-10-05T19:28:12+5:30

देशात ‘टॅलेंट’ची कमतरता नाही. केवळ शोध घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

'Search Talent Portal' from next month - Vijay Goel | ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ पुढील महिन्यापासून - विजय गोयल

‘सर्च टॅलेंट पोर्टल’ पुढील महिन्यापासून - विजय गोयल

Next
>- सचिन कोरडे/ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.05 -  देशात ‘टॅलेंट’ची कमतरता नाही. केवळ शोध घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून हे पोर्टल साकारले असून पुढील महिन्यात ते सुरू होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘ब्रिक्स’ या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी गोयल गोव्यात आले होते. त्या वेळी त्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, देशातील मुलांना ‘खरी संधी’ मिळावी या उद्देशाने हे ‘पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा विभागाने घेतला आहे. देशात कानाकोप-यातील मुलांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल. त्यांना स्पर्धेतील सहभाग, प्रदर्शन, कौशल्य, मोबाईल, ई-मेल आदी माहितीचा व्हिडिओ या पोर्टलवर अपलोड करावा लागेल. या पोर्टलवर आलेल्या सर्व व्हिडिओंचे क्रीडातज्ज्ञ अभ्यास करतील आणि त्यातून मुलांची निवड केली जाईल. निवडलेल्या मुलांना नजीकच्या साई केंद्राद्वारे मोफत प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, सुविधा उपल्ध करून दिल्या जातील. गुणवान आणि कौशल्यवान खेळाडूंचा शोध घेण्यास हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. 
 
कोणाला मिळेल संधी...
८ वर्षांवरील मुले आपला व्हिडिओ पाठवू शकतील. आॅलिम्पिक स्पर्धेत ज्या खेळांचा सहभाग आहे. ते सर्व खेळ खेळणाºया मुलांचा विचार केला जाईल. कौशल्य, तंत्र यावर अधिक भर असेल. या कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा संघटना, कार्पाेरेट हाउस आणि भागीदार यांचा समावेश आहे. जी मुले ही चाचणी उत्तीर्ण करतील त्यांना राज्य आणि केंद्र सरकारही मदत करेल. आपले निवास किंवा जवळचे क्षेत्र सोडण्यास ज्या मुलांना अडचण येत असेल त्या मुलांना नजीकच्या साई केंद्रात प्रशिक्षण मिळेल. 
 
पोर्टलसाठी दिग्गजांसोबत बैठक
आॅलिम्पिक स्पर्धा आटोपल्यानंतर देशभरातील विविध खेळांतील द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या मंडळींना एकत्र आणण्यात आले. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात असे घडले नव्हते. प्रत्येकाला त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांनी सर्वांची मते जाणून घेतली. दीर्घ चर्चेनंतर नरेंद्र मोदी यांनी पोर्टलची कल्पना मांडली. या कल्पनेचे प्रत्येकाने कौतुक केले आणि त्यातून आता पोर्टल सुरू होत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

Web Title: 'Search Talent Portal' from next month - Vijay Goel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.