राज्यात सात प्रकल्प, १२०८ रोजगार; १८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 10:13 AM2023-11-05T10:13:12+5:302023-11-05T10:13:27+5:30
येथे साकारणार प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात रोजगार निर्मिती करणारे ७ नवीन प्रकल्प येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य गुंतवणूक मंडळाने काल १८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
गोवा गुंतवणूक मंडळाची बैठक काल पार पडली. या बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
१२०८ रोजगार निर्माण होणार आहेत. आगामी प्रकल्पातून यापैकी मरिटाईम ग्लोबल लॉजिस्टिक्स अॅण्ड वेअरहाऊस कार्पोरेशनचा लॉजिस्टिक प्रकल्प हा सर्वांत मोठा असून यात ४९.२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पातून ४९२ रोजगार उत्पन्न होणार आहेत, अशी माहिती गुंतवणूक मंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. हा प्रकल्प वेर्णा औद्योगिक वसाहतीत होणार असून २४ हजार चौरस मीटर जागा या प्रकल्पासाठी आवश्यक आहे.
येथे साकारणार प्रकल्प
७ पैकी ३ प्रकल्प वेर्णा औद्योगिक वसाहतीत येणार आहेत, तर २ प्रकल्प सांगे औद्योगिक वसाहतीत येणार आहेत. पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत आणि पंचवाडी औद्योगिक वसाहतीत प्रत्येकी एका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ७ प्रकल्पांपैकी २ प्रकल्प हे अन्न प्रक्रिया प्रकल्प आहेत, चार प्रकल्प उत्पादन, तर एक लॉजिस्टिक्स प्रकल्प आहे.