कळंगुट किनारी भागातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 09:24 PM2017-09-28T21:24:18+5:302017-09-28T21:26:23+5:30
कळंगुट किनारी भागातील एका तारांकित हॉटेलात सुरु असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना अटक केली असून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन युवतींची सुटका केली आहे.
म्हापसा - कळंगुट किनारी भागातील एका तारांकित हॉटेलात सुरु असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना अटक केली असून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन युवतींची सुटका केली आहे.
सदर कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. कळंगुट येथे दोन युवतींना ग्राहकांसाठी पुरवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी या प्रकरणी बिगर सरकारी संस्थाच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. एका गाडीने दोन युवतींना घेऊन तिघे जण येथील एक तारांकित हॉटेल कासा रॉय अॅन हॉटेलमध्ये शिरले. सोबत आणलेल्या युवतींना हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीतील ग्राकहांना पुरवून ते तिघेही त्या हॉटेलमधून बाहेर पडले. त्याच दरम्यान तेथे असलेल्या पोलिसांनी त्या तिघानांही अटक केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची अधिक खोलवर चौैकशी पोलिसांनी केली असता त्यांनी त्या हॉटेलात केरळ राज्यातून आलेल्या ग्राहकांना मुंबई व महाराष्ट्रातील दोन मुली पुरवल्याची माहिती दिली. लागलीच पोलिसांनी त्या हॉटेलावर छापा टाकून त्या मुलींची सुटका केली व चौघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी केरळमधील चार ग्राहकांसमवेत मुलींचा पुरवठा करणारे ओडिसा, नेपाळ व केरळतील तिघांना मिळून सात जणांना ताब्यात घेतले. सुटका केलेल्या त्या दोन युवतींना नंतर न्यायदंडाधिकाºयासमोर हजर व नंतर त्यांची रवानगी पणजी जवळ असलेल्या मेरशी येथील अपना घरात करण्यात आली.
संबंधीत हॉटेलातील ज्या मजल्यावर हा प्रकार घडला त्या हॉटेलचा पहिला मजला पोलिसांनी नंतर सील केला. तसेच कळंगुट पंचायत व पर्यटन खात्याला पत्र पाठवून त्यांना देण्यात आलेले परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सदर हॉटेलात आलेल्या पाहुण्यांची हॉटेलच्या नोंदवहीत नोंद करण्यात आली नसल्याचे केलेल्या चौकशी दरम्यान पोलिसांना आढळून आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी त्या पिडीत युवतींना हॉटेलात सोडण्यासाठी वापरलेली एक गाडी तसेच त्या ग्राहकांकडून घेतलेले ७० हजार रुपये नकद व नऊ मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवतींचा पुरवठा करणाºया एकाला यापूर्वी अशाच प्रकरणात तीनवेळा अटक करुन नंतर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी सर्व संशयीता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जिवबा दळवी यांनी या उच्चभू्र सेक्स प्रकरणाचा छडा लावला असून उपनिरीक्षक सीताराम मळीक पुढील तपास करीत आहेत.