पर्यटन मोसमाच्या सुरुवातीलाच मडगावात सेक्स रॅकेट उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 02:36 PM2017-10-10T14:36:42+5:302017-10-10T15:15:59+5:30

गोव्यातील पर्यटन मोसम सुरु होऊन केवळ दहा दिवस उलटलेले असतानाच गोव्याची मुख्य आर्थिक बाजारपेठ म्हणून गणल्या जाणाऱ्या मडगाव या दक्षिण गोव्यातील मुख्यालयात पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे.

sex racket in madgaon | पर्यटन मोसमाच्या सुरुवातीलाच मडगावात सेक्स रॅकेट उघड

पर्यटन मोसमाच्या सुरुवातीलाच मडगावात सेक्स रॅकेट उघड

googlenewsNext
ठळक मुद्देमडगाव या दक्षिण गोव्यातील मुख्यालयात पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे.मडगाव पोलिसांनी फोंड्यात राहणाऱ्या मूळ बिहारच्या सुखजान खातून उर्फ सिमरन या महिलेला अटक केली आहे.

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव (गोवा): गोव्यातील पर्यटन मोसम सुरु होऊन केवळ दहा दिवस उलटलेले असतानाच गोव्याची मुख्य आर्थिक बाजारपेठ म्हणून गणल्या जाणाऱ्या मडगाव या दक्षिण गोव्यातील मुख्यालयात पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी फोंड्यात राहणाऱ्या मूळ बिहारच्या सुखजान खातून उर्फ सिमरन या महिलेला अटक केली आहे. तर देह विक्रीच्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या दोन बिगर गोमंतकीय युवतींची सुटका केली आहे.

सोमवारी रात्री मडगावच्या जुन्या स्टेशन रोड भागात दोन अनोळखी युवती संशयास्पदरितीने फिरत असल्याचे पोलिसांना कळून आल्यावर या दोन्ही युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले असता, या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. खातून हिने बिहार व पश्चिम बंगालातून या दोन्ही युवतींना गोव्यात आणले होते. मडगावपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या रामनगरी या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीत त्यांना ठेवण्यात आले होते. खातून स्वत: फोनवरुन ग्राहकांशी संपर्क साधत होती व त्यानंतर जागा ठरवून या दोन्ही युवतींना त्या ग्राहकाकडे पाठवून द्यायची अशी माहिती मडगावचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी दिली.

दरम्यान, १ जानेवारी ते १0 ऑक्टोबर या कालावधीत गोव्यात आतापर्यंत अशी २५ सेक्स रॅकेटची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यातील सर्वांत जास्त उत्तर गोव्यातील पर्यटकांची गर्दी असलेल्या कळंगूट पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाली आहेत. आतापर्यंत कळंगूट पोलिसांनी ११ अशी प्रकरणे नोंद केली आहेत. त्या पाठोपाठ पणजीत ६, मडगावात चार तर वेर्णा, वास्को, कोलवा व शिवोली या भागात प्रत्येकी एक प्रकरणाची नोंद झाली आहे. आतापर्यंत अशाप्रकरणात ५५ जणांना पोलिसांनी अटक केली असून या संघटीत सेक्स रॅकेटमध्ये ओढल्या गेलेल्या ४२ युवतींची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे.

Web Title: sex racket in madgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.