सेक्स रॅकेट्स पोहोचली नागरी वस्त्यांमध्ये..!
By Admin | Published: August 19, 2015 01:48 AM2015-08-19T01:48:07+5:302015-08-19T01:50:50+5:30
पणजी : पणजी पोलिसांनी दोनापावला येथील मोडेल स्टेटस अपार्टमेंटमध्ये छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना
पणजी : पणजी पोलिसांनी दोनापावला येथील मोडेल स्टेटस अपार्टमेंटमध्ये छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली व दोन युवतींची सुटका केली. या फ्लॅटमध्ये आणून ठेवलेल्या युवतींना गिऱ्हाइकांपर्यंत पोहोचविण्याचे काम
येथून केले जात होते.
अटक करण्यात आलेल्यांची नावे अफान अहमद, अंधेरी (पश्चिम) मुंबई, एम. डी. शबीर, कोलकाता, एम. डी. इम्रान फारुख, झारखंड अशी आहेत. सुटका करण्यात आलेल्या युवती या मुंबईतील आहेत. त्यांना वेश्या व्यवसायासाठी संशयितांनी गोव्यात आणले होते. हॉटेल व मसाज पार्लरवर पोलिसांचे लक्ष असल्यामुळे रहिवासी हॉटेलमध्ये या युवतींना आणले होते. त्यांचा हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली व सर्व संशयितांना
अटक केली.
छापा टाकण्यात आल्यानंतर युवतींनी त्यांना जबरदस्तीने या ठिकाणी आणून वेश्या व्यवसायास लावल्याचे पोलिसांना सांगितले. युवतींची रवानगी अपना घरमध्ये करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)