गोव्यात एनजीओच्या मदतीने सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटचा पदार्फाश, दोन युवतीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:31 PM2024-06-01T15:31:49+5:302024-06-01T15:32:47+5:30
युगांडातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत माता आणि एका युवतीला गोव्यातील रेस्टॉरंट आणि कॉफी शॉपमध्ये नोकरीचे खोटे आश्वासन देऊन फसवण्यात आले होते. दोघींचीही सुटका करण्यात आली. तर तस्कराला अटक केली आहे.
पेडणे : मांद्रे पोलिसांनी पोलीस निरीक्षक शेरीफ जॅक्स यांच्या मार्गदर्शनाखली आंरराष्ट्रीय सेक्स ट्रॅफीकिंग रॅकेटचा पादार्फाश केला. युगांडातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत माता आणि एका युवतीला गोव्यातील रेस्टॉरंट आणि कॉफी शॉपमध्ये नोकरीचे खोटे आश्वासन देऊन फसवण्यात आले होते. दोघींचीही सुटका करण्यात आली. तर तस्कराला अटक केली आहे.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला भारतात आणल्यानंतर संशयिताने धमकावून पासपोर्ट आणि व्हिसा बळजबरीने काढून घेतला. तिला धमक्या देत वेश्या व्यवसायात आणले आणि त्यांच्या कडून लाखो रुपये लुटले. एक ग्रुप असे रॅकेट ऑनलाईन ऑपरेट करत होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक्सपोर्ट वेबसाईटचाही फायदा घेत होता. हरमल येथे समुद्र किनाऱ्यावर आणि रस्त्यावर युवतीला उभे केले जायचे.
पेडणे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत एकाने युगांडाच्या दूतावासाशी संपर्क साधला आणि दूतावासाच्या मदतीमुळे गोवा पोलिस पीडितांच्या ठिकाणापर्यंत पोचू शकले. पीडितेचा शोध मांद्रेचे पोलिस निरीक्षक आणि अर्ज या एनजीओने घेतला. आणि अनेक अडचणीतून दोघांची सुटका करण्यात आली. एका तस्कराला पकडण्यात यश आले.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव ऋषी जोजो नाकीटू (३१, युगांडा) असे आहे. पोलिसांनी भादंसं कलम ३७० आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याखाली ४,५,७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सुटका केलेल्यांना मेरशी येथील अपना घरामध्ये पाठवले आहे.