पाहुणी म्हणून आली चोरी करुन पळाली, तरुणीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 03:27 AM2023-04-08T03:27:09+5:302023-04-08T03:27:39+5:30
यासंदर्भात निशीता नाईक यांनी तक्रार दाखल केली होती. हा प्रकार ३ ते ४ एप्रिल दरम्यान घडला असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. संशयित तक्रारदाराच्या घरी पूर्वी भाड्याने रहात होती.
साल्मोना वाडा - साळगांव येथे घरात पाहूणी बनून आली आणि पाहुणाचार घेतल्यानंतर, घरातील २ लाख ९० हजार रुपयांच्या दागिन्याची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी साळगांव पोलिसांनी संशयित प्राजक्ता खावनेकर (२२ वय, कुडाळ ) हिला अटक केली असून तिच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
यासंदर्भात निशीता नाईक यांनी तक्रार दाखल केली होती. हा प्रकार ३ ते ४ एप्रिल दरम्यान घडला असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. संशयित तक्रारदाराच्या घरी पूर्वी भाड्याने रहात होती.
संशयित तरुणीने घरातील कपाटात असलेले मंगळसूत्र, सोन्याची साखळी, बांगड्या, नथ, अंगठी अशी सुमारे २ लाख ९० हजार रुपयांची चोरी केली आहे. तक्रारीनंतर संशयित तरुणीला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. रचलेल्या सापळ्यात ती सापडल्याने तिला नंतर ताब्यात घेण्यात आले. रिमांडासाठी न्यायालया समोर उपस्थित केले असता न्यायालयाने ४ दिवसांचा पोलीस रिमांड दिला आहे. संशयिताच्या चौकशी दरम्यान चोरलेले मंगळसुत्र जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास कार्यउपअधिक्षक विश्वेश कर्पे तसेच निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक सुर्याकांत कोलवेकर यांच्या मार्फत सुरु आहे.