शिवोलीत युवतीला जाळले

By Admin | Published: May 13, 2017 02:16 AM2017-05-13T02:16:40+5:302017-05-13T02:18:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कहणजूण : बामणवाडो-शिवोली येथे १८ ते २० वर्षीय अज्ञात युवतीचा जाळून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात

Shivloli burned the girl | शिवोलीत युवतीला जाळले

शिवोलीत युवतीला जाळले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हणजूण : बामणवाडो-शिवोली येथे १८ ते २० वर्षीय अज्ञात युवतीचा जाळून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली. बामणवाडो-शिवोली येथे एसएफएक्स हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या मैदानाच्या एका कोपऱ्यात निर्जनस्थळी एक जळालेला मृतदेह पहाटे चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांच्या नजरेस पडला. त्यांनी हणजूण पोलिसांना कळविले. दि. ११ रोजी रात्री अज्ञाताने केरोसीन ओतून मृतदेह जाळला असावा, असा अंदाज आहे. मृतदेहाच्या कंबरेखालचा भाग जळून खाक झाला होता व पाय वेगळे पडले होते. त्यातील एक पाय भटक्या कुत्र्यांनी दूरवर नेऊन टाकला होता. मृतदेहापासून जवळच एक लायटर पडलेला होता. जमिनीवरील खुणांवरून जाळण्यापूर्वी त्या युवतीस फरफटत त्या ठिकाणी आणल्याचे दिसून येत होते. मृतदेहाच्या हातात एक अंगठी होती, तर दुसऱ्या हातात एक धातूची बांगडी होती. नखांवर नेल पॉलिश लावलेले होते. यावरून ती महिला असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
खबर मिळताच हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक संजय दळवी घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर उपअधीक्षक रमेश गावकर, उत्तर गोवा अधीक्षक कार्तिक कश्यप, पोलीस महानिरीक्षक विमल गुप्ता, उपअधीक्षक सेराफिन डायस, निरीक्षक ब्रास मिनेझिस, निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ठसेतज्ज्ञांचे पथकही बोलविण्यात आले होते.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले की, मृतदेह १८ ते २० वर्षांच्या युवतीचा असावा, असा अंदाज आहे. ही अल्पवयीन युवती असू शकते, असेही ते म्हणाले. वैयक्तिक दुश्मनीतून, प्रेमसंबंधातून किंवा बलात्कार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी अज्ञात संशयिताने मृतदेह जाळून खून केला असावा.
खून करण्यापूर्वी तिला दुसरीकडे मारून या ठिकाणी जाळले असावे, या दृष्टिकोनातून तपासकार्य सुरू आहे. एखादी युवती किंवा महिला हरवल्याची तक्रार नोंद झाली आहे का किंवा तशी घटना घडली आहे का, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Shivloli burned the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.