पर्यटकां अभावी शॅक व्यवसाय बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:58 PM2018-05-06T21:58:21+5:302018-05-06T21:58:21+5:30

वाढत्या उकाड्यामुळे ऐन पर्यटनाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याने राज्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचे परिणाम झाले आहेत.

Shock business abstinence from tourists | पर्यटकां अभावी शॅक व्यवसाय बंद 

पर्यटकां अभावी शॅक व्यवसाय बंद 

Next

म्हापसा : वाढत्या उकाड्यामुळे ऐन पर्यटनाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी झाली असल्याने राज्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचे परिणाम झाले आहेत. बहुतांश पर्यटकांचा ओढ थंड हवेच्या ठिकाणी असल्याने पर्यटकांच्या अभावी शॅक व्यवसायांनी आपला व्यवसाय गुंडाळायला सुरवात केली आहे तर काही व्यवसायिकांनी आपला व्यवसाय बंद सुध्दा केला आहे. शॅक कल्याण संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार ७० टक्के शॅक बंद करण्यात आले आहेत.  

राज्यात पर्यटन हंगाम्याला नोव्हेंबरात सुरवात होऊन पावसाळा दाखल होईपर्यंत सुरुच असतो. नोव्हेंबरात विदेशातून चार्टड विमाने दाखल व्हायला सुरवात झाल्यानंतर ख-या अर्थाने हंगाम्याला तेजी यायला लागते. दिवाळीत शाळांना पडणाºया सुट्ट्यांच्या दिवसात तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर देशी पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. सलग सुट्ट्या आल्या तरी पर्यटक येत असतात. 

यंदा पावसाळा सुरु होण्यास काही दिवसांचा अवघी असला तरी या वर्षी मे महिन्याच्या सुरवातीलाच पर्यटन हंगाम्यावर पर्यटकांच्या अभावी परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विदेशी पर्यटकाबरोबर देशी पर्यटकांची संख्या किनारी भागात अल्प अशी दिसून आली असून सध्या किनाºयावर दिसणाºया लोकात फक्त स्थानीकांचीच संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. 

काही व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पर्यटन हंगाम्याच्या सुरवातीला पर्यटकांची संख्या समाधानकारक होती त्यामुळे व्यवसाय सुद्धा चांगला झाला होता पण काही दिवसापूर्वी समुद्राच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून त्याची झळ व्यवसायाला पोहचली आहे. गोव्याऐवजी त्यांनी दुसºया थंडगार अशा पर्यटन स्थळी जाण्यास पसंदी दिली असल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली. 

उत्तर गोव्यातील कांदोळी, कळंगुट, बागा, सिकेरी, वागातोर, हणजुण, हरमल, मोरजी सारख्या प्रसिद्ध किनाºयांवर शॅक व्यवसायिकांनी आवरा आवर करण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी व्यवसाय गुडांळला असून काहिंनी आपला व्यवसाय मर्यादीत स्वरुपात सुरु ठेवला तर काहिंनी दिलेल्या माहितीनुसार पुढील रविवारपर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर व्यवसाय बंद केला जाईल. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यार्यंत किनाºयावरील शॅक व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे. बंद करण्यात आलेल्या शॅकांवरील कामगार सुद्धा माघारी परतले आहेत. बहुतांश कामगार हे उत्तर भारतातील असतात. हंगामा सुरु होण्याच्या दिवसात नंतर ते पुन्हा दाखल होत असतात. 

कळंगुट किनारी परिसरात स्थानीक या दिवसात मोठ्या प्रमाणावर आंघोळ करण्यासाठी जात असतात. सहलींचे आयोजन सुध्दा केले जाते. त्यामुळे या दिवसात स्थानीकांची वर्दळ या भागात जास्त असल्याने सध्या इथल्या व्यवसायिकांचा व्यवसाय स्थानीकांवर अवलंबून राहिला आहे. त्याला मात्र काही प्रमाणावर गोव्यात आलेल्या देशी पर्यटकांची जोड लाभली आहे. 

शॅक कल्याण संघटनेचे अध्यक्ष कु्रज कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ७० टक्के व्यवसायिकांनी पर्यटकांच्या अभावी व्यवसाय बंद केला आहेत. राहिलेले व्यवसायीक २० में पर्यंत व्यवसाय बंद करतील. मागील काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी शॅक व्यवसायाला जास्त फटका बसला असल्याचे ते म्हणाले. व्यवसायावर परिणाम होण्यासाठी कारणे वेगळी असली तरी सुरु असलेला आपीएल, नोटबंदी व जीएसटीचे परिणाम अजुनपर्यंत व्यवसायावर पडलेले आहेत. 

Web Title: Shock business abstinence from tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.