राज्यात धर्मांतरणाची प्रकरणे धक्कादायक; गरीबीचा घेतला जातो फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 07:12 PM2023-11-08T19:12:28+5:302023-11-08T19:13:38+5:30
एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात इतर धर्मातील नागरिकांना ख्रिश्चन धर्म स्वीकरण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखवत असल्याचा दावा या तक्रारदाराने केला.
पणजी : सुशिक्षित गोव्यात मागील काही दिवसांपासून धर्मांतरणाची प्रकरणे वाढत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गाेव्यात विविध धर्माचे लोक एकत्रित राहत आहेत. पण काही अशा संघटना आहे ज्या गरीब लाेकांच्या गरीबीचा फायदा घेऊन त्यांचे धर्मांतरण केले जात आहे. नुकतेच ओल्ड गोवा परिसरात अशीच घटना समोर आली आहे. आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने धर्मांतरण करत असल्यामुळे ताळगाव येथील दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात इतर धर्मातील नागरिकांना ख्रिश्चन धर्म स्वीकरण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखवत असल्याचा दावा या तक्रारदाराने केला. याची दखल घेऊन जुने गोवा पोलिसांनी या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास जुने गोवा पोलीस करत आहेत. या अगाेदर अशाच प्रकारची अनेक प्रकरणे राज्यात घडली आहे. त्याच प्रमाणे सध्या सोशल मिडीयावर विविध धर्माच्या विरोधात असे पोस्ट वायरल केले जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याची गंभीर दखल घेतली असून जे लाेक धर्माच्या विरोधात बाेलतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहे, तरीही धर्मावर बाेलणे तसेच धर्मांतर करण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत.