नफे सिंगला मारणारे शूटर्स गोव्यात जेरबंद; हरियाणा-दिल्ली पोलिसांची कारवाई
By वासुदेव.पागी | Published: March 4, 2024 03:36 PM2024-03-04T15:36:24+5:302024-03-04T15:36:29+5:30
या प्रकरणात दोघेही फरार झाल्यामुळे हरयाणा पोलिस त्यांच्या मागावर होते.
पणजी: गेल्या महिन्यात हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलॆडी) चे प्रमुख नफे सिंग राठी यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दोन शार्प शूटर्सना आज गोव्यात अटक करण्यात आली.
हरियाणा पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गोव्यात हणजूणन आणि कळंगुट भागात केलेल्या संयुक्त कारवाईत सौरभ आणि आशिष यांना अटक करण्यात आली. या दोघांचाही नफे सिंग राठी यांच्या हत्त्येत सहभाग होता. त्यांना शार्प शूटर म्हणून या कटात समावेश करण्यात आले होते.
या प्रकरणात दोघेही फरार झाल्यामुळे हरयाना पोलिस त्यांच्या मागावर होते. ते गोव्यात दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर व्यवस्थितपणे सापळा रचून त्यांना पकडण्यात हरियाना पोलिसांना यश मिळाले . हणजूण पोलिसांनी या मोहिमेत हरियाना पोलिसांना मदत केली. दोन्ही शूटर कुख्यात कपिल सांगवान टोळीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. २५ फेब्रुवारी रोजी आशिष, सौरभ, नकुल आणि अतुल या चौघांनी राठी आणि किशनच्या वाहनावर गोळीबार केला होता.