बागा किनाऱ्याजवळील दुकानाला आग, हजारोंचे नुकसान
By काशिराम म्हांबरे | Published: November 23, 2023 11:06 AM2023-11-23T11:06:43+5:302023-11-23T11:07:03+5:30
आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
म्हापसा : पर्यटकांसोबत लोकांची सततची वर्दळ असलेल्या प्रसिद्ध अशा बागा किनाऱ्याला लागून असलेल्या या एका दुकानात आज गुरुवारी सकाळी आग लागण्याची घटना घडली. लागलेल्या आगीत सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आग लागण्याची घटना सकाळी ७.१५ वाजण्याच्या अंदाजाला घडली. पिळर्ण अग्नी शमन दलाच्या जवानांनी तातडीने घटना स्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. इतर वेळेला आग लागली असती तर वाहनांच्या तसेच लोकांच्या गर्दीतीन वाट काढून घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवणे दलाच्या जवानांना त्रासदायी ठरले आहे.
दलाचे उपअधिकारी एन चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी गेलेल्या जवानांनी दीड तासाच्या श्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत काही लाकडी सामान, लॅपटॉट वातानुकूलीत यंत्रणा सारखे साहित्य जळून खाक झाले. सुमारे १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले.