गोवा भाजपमध्ये नेतृत्वाची उणिव नाही, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 07:22 PM2018-07-05T19:22:24+5:302018-07-05T19:22:26+5:30
गोव्यातील भाजपमध्ये दुस:या फळीतील नेतृत्वाची उणीव नाही. फक्त अशा नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
पणजी : गोव्यातील भाजपमध्ये दुस:या फळीतील नेतृत्वाची उणीव नाही. फक्त अशा नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
नाईक यांनी खासदार नरेंद्र सावईकर व विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत भाजपच्या येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने देशभरातील शेती व शेतक:यांसाठी आणलेल्या योजनेबाबत माहिती देण्यासाठी परिषदेचे आयोजन होते. तथापि, गोव्यात योग्य असे नेतृत्व सापडत नाही व आपल्याला ते तयार करायचे आहे अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री र्पीकर यांनी बुधवारी केल्याविषयी पत्रकारांनी विचारताच नाईक म्हणाले, की भाजपमध्ये नेतृत्वाची उणीव नाही. दुस:या फळीतील नेतृत्व आहे पण त्यास प्रोत्साहन द्यावे लागेल.
राज्यातील तिन्ही खासदारांनी व आमदारांनी ड्रग्ज व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी संघटीत व्हावे असे विधान मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले होते, त्याबाबत बोलताना मंत्री नाईक यांनी आम्ही ड्रग्जच्या विरोधातच आहोत असे सांगितले. गोव्याला लागलेली अंमली पदार्थ व्यवहारांची किड नष्ट करायला हवी. आमचे त्यासाठी कुणालाही कायम सहकार्य असेल, असे नाईक म्हणाले.
केंद्रीय आयुष मंत्रलयाने गोव्यात धारगळ व अन्यत्र आयुव्रेदिक इस्पितळ व नेचरोपथी संस्था होऊ घातली होती. या प्रकल्पांचे पुढे काय झाले असे पत्रकारांनी विचारताच राज्य सरकारमधील प्रशासकीय अडचणींमुळे या प्रकल्पांना विलंब झाला असे नाईक यांनी नमूद केले. धारगळ येथील जागा क्रिडा खात्याकडे होती. ती आरोग्य खात्याकडून आयुष मंत्रलयाकडे येण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर काम सुरू होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापुढे हा प्रस्ताव येईल, असे मंत्री नाईक म्हणाले.
केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा गोव्यातीलही शेतक:यांला लाभ होईल. वाढीव हमीदराचा लाभ शेतक:यांना झाल्यानंतर कृषी उत्पादने वाढतील, असे नाईक म्हणाले. गोव्यातील काही मंत्री, आमदार शेतात उतरले. त्यामुळे अन्य लोकांनाही शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी नमूद केले.