सिद्धेश नाईक यांचा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 01:38 PM2024-08-02T13:38:25+5:302024-08-02T13:38:46+5:30

आता कामाचा व्याप वाढला आहे त्यामुळे तेवढा वेळ द्यायला मिळत नसल्याने या पदाचा राजीनामा दिला असं त्यांनी सांगितले.

Siddesh Naik resigns from the post of North Goa Zilla Panchayat President  | सिद्धेश नाईक यांचा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा राजीनामा 

सिद्धेश नाईक यांचा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा राजीनामा 

नारायण गावस

पणजी: उत्तर गोवा जिल्हा पंचायतचे अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी आपल्या अध्यक्षपदाचा शुक्रवारी राजीनामा दिला. भाजपच्या कोर टीमच्या सांगण्यावरुन व पक्षाच्या सुचनेवरुन आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष नव्या अध्यक्षांची निवड करेल त्याला पूर्ण पाठिंबा असणार आहे, असे यावेळी सिद्धेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सिद्धेश नाईक म्हणाले आपण भाजपच्या वरिष्ठ नेते तसेच पक्षाच्या सुचनेनुसार राजीनामा दिला आहे. पक्षाने दोन्ही जिल्हा पंचायत अध्यक्षांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. या अगोदर दक्षिण गाेवा जिल्हा पंचायत मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी राजीनामा दिला होता. आता आपण दिला आहे. सध्या जिल्हा पंचायत मध्ये अनेक वरिष्ठ सदस्य आहेत त्यांना या अध्यक्षपदाची संधी मिळावी हा आमचा हेतू आहे असे ते म्हणाले. तसेच आता कामाचा व्याप वाढला आहे त्यामुळे तेवढा वेळ द्यायला मिळत नसल्याने या पदाचा राजीनामा दिला आहे.

सिद्धेश नाईक म्हणाले, गेल्या ३.५ वर्षात आमच्या मतदारसंघात अनेक विकासकामे जिल्हा पंचायत निधी मार्फत केली आहे. शाळांना स्मार्ट बाेर्ड दिले आहेत. तसेच अंगणवाडी अन्य काही शाळांना पाणी स्वच्छ करणारे मशिन दिले तसेच मातदारसंघात रस्ते केले. दिवार बेटेवर सिसिटीव्ही कॅमरा, तसेच अन्य विविध विकासाभिमुख कामे केली आहेत. तसेच आता अजून दीड वर्ष मी सदस्य म्हणून आहे त्यामुळे पुढे कामे करत राहणार आहे.

विधानसभा लढण्यास इच्छुक
राज्यात २०२७ रोजी हाेणारी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक लोकांची मी ही विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आपणही इच्छुक आहे. तरी अजून निवडणूकांना २.५ वर्ष आहेत त्यामुळे पक्ष काय निर्णय घेणार ते पहावे लागेल.

Web Title: Siddesh Naik resigns from the post of North Goa Zilla Panchayat President 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा