म्हापसा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज; डॉ. नुतन बिचोलकर यांची निवड निश्चित
By काशिराम म्हांबरे | Published: February 22, 2024 04:02 PM2024-02-22T16:02:13+5:302024-02-22T16:05:01+5:30
माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता.
म्हापसा: माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या राजीनाम्या नंतर रिक्त झालेल्या म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी डॉ. नुतन बिचोलकर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज आल्यानेत्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यांच्या जाग्यावर नव्या नगराध्यक्षाची निवड करण्यासाठी उद्या शुक्रवार २३ रोजी मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. डॉ. नुतन बिचोलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने उद्याची बैठक केवळ औपचारीकता पूर्ण करण्यासाठी होणारी आहे. या बैठकीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा बैठकीचे निर्वाचन अधिकारी उदय प्रभूदेसाईयांच्याकडून केली जाणार आहे. निवडीनंतर पालिकेच्या विद्यमान मंडळातील बिचोलकर या तिसºया नगराध्यक्षा ठरतील. मिशाळ यांच्या पूर्वी शुभांगी वायंगणकर या नगराध्यक्षा होत्या. बुधवारी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता.