एकूण सहा प्रकरणात कामाक्षी फॉरेक्स विरोधात सीबीआयचे आरोपपत्र, 900 ग्राहकांना सुमारे 55 कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:30 PM2018-01-01T19:30:27+5:302018-01-01T19:30:32+5:30
जादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून कोटय़वधींची गुंतवणूक करुन घेऊन नंतर जवळपास 900 गुंतवणूकदारांना तब्बल 55 कोटींचा फटका घालणा:या मडगावातील कामाक्षी फॉरेक्स
मडगाव : जादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून कोटय़वधींची गुंतवणूक करुन घेऊन नंतर जवळपास 900 गुंतवणूकदारांना तब्बल 55 कोटींचा फटका घालणा:या मडगावातील कामाक्षी फॉरेक्स प्रा. लि. या कंपनीच्या तीन संचालकांविरोधात या प्रकरणात तपास करणा:या सीबीआयने तब्बल सहा प्रकरणात मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
आतार्पयत या आस्थापनाविरोधात 11 वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे नोंद झाले असून इतर प्रकरणात येत्या चार महिन्यात सीबीआय आरोपपत्र दाखल करेल अशी माहिती सुत्रकडून मिळाली. या कंपनीचा मालक निलेश रायकर, त्याची पत्नी निलिमा व आई रेखा यांच्याविरोधात ही आरोपपत्रे दाखल झाली आहेत. यापूर्वी या तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्या तिघांही जणांना जामीनावर मुक्त करण्यात आले.
या प्रकरणाची पाश्र्र्वभूमी अशी की, 2004 मध्ये विदेशी चलनाची देवाण-घेवाण करणारे तसेच ग्राहकांकडून गुंतवणूक करुन घेणारे हे आस्थापन सुरु झाले होते. ज्या ग्राहकांनी या कंपनीकडे गुंतवणूक केली होती त्यांना सर्वसाधारण बँकांपेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र 8 एप्रिल 2016 रोजी या आस्थापनाच्या मडगावच्या कार्यालयास टाळे ठोकल्याने गुंतवणूकदारांमध्ये हलचल माजली होती. यानंतर कित्येक ग्राहकांनी मडगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. कालांतराने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर ग्राहकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवावा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होत्या त्यानुसार हे 11 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.