दिगंबरसह सहाजणांवर आरोपपत्र
By admin | Published: September 29, 2015 01:46 AM2015-09-29T01:46:52+5:302015-09-29T01:47:01+5:30
पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव तसेच कंपनीचे माजी अधिकारी आणि जैकाचे प्रकल्प संचालक मिळून एकूण सहा जणांविरुध्द सोमवारी गुन्हा अन्वेषण
पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव तसेच कंपनीचे माजी अधिकारी आणि जैकाचे प्रकल्प संचालक मिळून एकूण सहा जणांविरुध्द सोमवारी गुन्हा अन्वेषण विभागाने(क्राइम ब्रँच) येथील विशेष न्यायालयात ४८२ पानी प्राथमिक आरोपपत्र सादर केले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व संशयित म्हणून नाव घातलेले आहे. चौकशीसाठी कामत यांच्या कोठडीची गरज पोलिसांनी व्यक्त केली आहे.
चर्चिलसह सहाजणांविरुध्द गुन्हेगारी संगनमतासाठी भादंसंच्या कलम १२0 (ब), पुरावे नष्ट केल्याबद्दल कलम २0१ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,८,९ आणि १३ खाली आरोप ठेवले आहेत. एफआयआर नोंद केल्यानंतर ६0 दिवसांच्या आत आरोपपत्र सादर करावे लागते. ही मुदत सोमवार, दि. २८ रोजी संपत होती त्यामुळे गुन्हा अन्वेषण विभागाने अखेरच्या दिवशी आरोपपत्र सादर केले.
लुईस बर्जरचे माजी आशिया विभागप्रमुख जेम्स मॅकलंग, कंपनीचे भारतातील माजी प्रमुख सत्यकाम मोहंती, हवाला एजंट रायचंद सोनी, जैकाचे येथील प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर, मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा यांचा आरोपपत्र दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे मॅकलंग याची या प्रकरणात चौकशीही झालेली नाही. चर्चिल आणि वाचासुंदर कोठडीत आहेत. मोहंती व सोनी जामिनावर सुटलेले आहेत, तर आर्थूर डिसिल्वा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने ते बाहेर आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी २१ जुलै रोजी गुन्हा नोंद केला. प्रकल्प संचालक वाचासुंदर यांना सर्वप्रथम अटक केली. अमेरिकेत न्यू जर्सी कोर्टात मॅकलंग याने गोव्यातील मंत्री
(पान २ वर)