पाच वर्षापासून छोट्या खोलीत गुदमरतेय वास्को अग्नीशमन दलाचे कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 04:36 PM2019-02-24T16:36:13+5:302019-02-24T16:37:54+5:30

दक्षिण गोव्याच्या मुरगाव तालुक्यातील एक लाखहून जास्त लोकांना सुरक्षा देण्यासाठी सतत सतर्क असलेल्या वास्को अग्निशामक दलाला मागच्या पाच वर्षापासून एका छोट्या खोलीतून काम करावे लागत आहे.

small room for vasco fire station office | पाच वर्षापासून छोट्या खोलीत गुदमरतेय वास्को अग्नीशमन दलाचे कार्यालय

पाच वर्षापासून छोट्या खोलीत गुदमरतेय वास्को अग्नीशमन दलाचे कार्यालय

Next

वास्को: दक्षिण गोव्याच्या मुरगाव तालुक्यातील एक लाखहून जास्त लोकांना सुरक्षा देण्यासाठी सतत सतर्क असलेल्या वास्को अग्निशामक दलाला मागच्या पाच वर्षापासून एका छोट्या खोलीतून काम करावे लागत आहे. वास्को अग्निशामक दलाची असलेली दोन मजली कार्यालय इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ती २०१४ साली खाली केल्यानंतर २०१७ मध्ये पाडण्यात आली. नवीन इमारतीचे बांधकाम अजून सुरू करण्यात आलेले नसून लोकांच्या हितासाठी कुठल्याही क्षणी धावणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांना अशा परिस्थितीत ठेवणे योग्य आहे काय असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे.

मुरगाव तालुक्यात मुरगाव बंदर, इंडियन आॅइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, गोवा शिपयार्ड, दाबोळी विमानतळ अशी अनेक महत्वपूर्ण आस्थापने असून या आस्थापनांच्या सुरक्षेबरोबरच मुरगाव तालुक्यातील एक लाखाहून जास्त नागरिकांच्या हितासाठी वास्को अग्निशामक दल सतत सतर्क असते. आग तसेच इतर कुठल्याही आपतकालीन वेळेत त्वरित पावले उचलून लोकांना सुरक्षा देण्यासाठी जागृत असणा-या वास्को अग्निशामक दलाने २०१८ सालात मुरगाव तालुक्यातील विविध भागात एकूण २९९ घटनेवर पोहचून येथे होणारा पुढचा अनर्थ टाळला आहे. यापैंकी १३८ आगीच्या घटना असून येथील आग विझवून सुमारे २ कोटी ४६ लाख ६६ हजार रुपयांची मालमत्ता बचावण्यास २०१८ सालात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे.

याबरोबरच वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी अन्य काही आपतकालीन घटनेत त्वरित धाव घेऊन येथे होणारी पुढची नुकसानी सुद्धा रोखली आहे. कुठल्याही क्षणी जनतेच्या सुरक्षतेसाठी धावणा-या ह्याच अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचा-यांना मागच्या ५ वर्षापासून छोट्याशा खोलीतून कामकाज करावे लागत असल्याने याचा त्यांना बराच त्रास सोसावा लागत असल्याचे दिसून आले आहे. मागील पाच वर्षापासून वास्को अग्निशामक दल तीन छोट्या खोलीतून काम करत असून ही जागा त्यांना पूर्वीच अपूरी असून त्यात त्यांचे सामान, आग विझवण्याची सामग्री इत्यादी गोष्टीमुळे येथे काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांना खरोखरच कठिण परिस्थितीतून जावे लागत असल्याचे म्हणावे लागणार. वास्को अग्निशामक दलाच्या ताफ्यात ४६ जवान, कर्मचारी व अधिकारी वर्ग असून एका पाळीत येथे सुमारे १६ जवान, कर्मचारी व अधिकारी कामाला असतात. ही खोली एवढ्या कर्मचा-यांना कमी पडत असल्याने ह्या खोलीच्या मागे असलेल्या अग्निशामक दलाच्या रहिवाशी इमारतीत ड्युटीवर असलेल्या जवानांना राहण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.

वास्को अग्निशामक दलाची पूर्वी कार्यालय इमारत असताना कुठे घटना घडल्यास जवान, अधिकारी त्वरित ‘इमरजेंन्सी आलार्म’ वाजवल्यानंतर एकत्र येऊन घटनास्थळावर धाव घ्यायचे. सध्या वास्को अग्निशामक दलाच्या कार्यालय एका छोट्या खोलीत असून ड्युटीवर असलेल्या जवानांना मागे असलेल्या रहिवाशी इमारतीत राहण्याची व्यवस्था केल्याने ‘इमरजेंन्सी’ च्या वेळी एकत्र होण्याची काही वेळ जात असल्याची माहिती दलातील सूत्रांनी दिली.

याबरोबरच रात्रीच्या वेळी घटना घडल्यास ड्युटीवरील जवान मागे असलेल्या अग्निशामक दलाच्या रहिवाशी इमारतीत राहत असल्याने त्यांना बोलवण्यात येत असताना ह्या इमारतीत आजूबाजूला राहत असलेल्या दलाच्या इतर कुटुंबियांना सुद्धा त्रास सोसावा लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या खोलीत वास्को अग्निशामक दलाचे कार्यालय कार्यरत आहे, त्याचे छप्पर नळ््यांचे असून छपरातून कबुतर व इतर पक्षी येतात आणि घाण करत असल्याने याचा सुद्धा यांना त्रास सोसावा लागत आहे. 

Web Title: small room for vasco fire station office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा