स्मार्ट सिटी मजूर मृत्यू प्रकरण: प्रकल्प कंत्राटदार, सुपरवायझरला अटक

By वासुदेव.पागी | Published: October 17, 2023 06:03 PM2023-10-17T18:03:14+5:302023-10-17T18:03:40+5:30

दोघांविरूद्ध सोमवारी जुने गोवे पोलिसांनी नोंदविला होता गुन्हा

Smart city laborer death case: Project contractor, supervisor arrested in goa | स्मार्ट सिटी मजूर मृत्यू प्रकरण: प्रकल्प कंत्राटदार, सुपरवायझरला अटक

स्मार्ट सिटी मजूर मृत्यू प्रकरण: प्रकल्प कंत्राटदार, सुपरवायझरला अटक

वासुदेव पागी, पणजी: रायबंदर येथील दिवाडी फेरी धक्क्याजवळली स्मार्ट सिटी कामगाराच्या मृत्यू प्रकरणात स्मार्टसीटी प्रकल्पाचे कंत्राटदार मणिकंदन सीरांगन याच्यासह सुपरवायझर निशांत कुमार मुथुरामन यांना आज अटक केली. दोघांविरूद्ध सोमवारी जुने गोवे पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षेचे प्रबंध न करता कामगारांना जीव धोक्यात घालून काम करण्यास भाग पाडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. प्रकल्पाचे काम सुरू असताना बिहार येथील अंगद कुमार पंडित (२८) हा मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला होता. गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. मंगळवारी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जुने गोवे पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Smart city laborer death case: Project contractor, supervisor arrested in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.