...म्हणून मनोहर पर्रिकर यांचा सत्कार कार्यक्रम रद्द

By admin | Published: October 3, 2016 08:37 PM2016-10-03T20:37:25+5:302016-10-03T20:37:25+5:30

देशाच्या सीमेवर तणावाची स्थिती असताना आणि सैनिकांना डोळ्य़ात तेल घालून रोज काम करावे लागत असताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा सत्कार पणजीत घडवून आणण्याची योजना

... so Manohar Parrikar's felicitation program canceled | ...म्हणून मनोहर पर्रिकर यांचा सत्कार कार्यक्रम रद्द

...म्हणून मनोहर पर्रिकर यांचा सत्कार कार्यक्रम रद्द

Next

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 3 - देशाच्या सीमेवर तणावाची स्थिती असताना आणि सैनिकांना डोळ्य़ात तेल घालून रोज काम करावे लागत असताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा सत्कार पणजीत घडवून आणण्याची योजना भाजपने आखली होती. त्यासाठी नऊ हजार दुचाक्यांतून कार्यकर्ते येतील असेही जाहीर करण्यात आले होते पण हा प्रकार योग्य नसल्याची टीका समाजाच्या विविध स्तरांमधून होत असल्याची दखल भाजपने घेतली व नियोजित सत्कार रद्द केला.

भाजपची गेल्या शनिवारी पणजीत राज्य कार्यकारिणी बैठक झाली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व इतरांनी पर्रिकर यांचा पणजीत आझाद मैदानावर 4 ऑक्टोबर रोजी सत्कार केला जाईल, असे जाहीर केले होते. तसेच प्रथम दाबोळी विमानतळावर मुरगावचे भाजप कार्यकर्ते पर्रिकर यांचे स्वागत करतील आणि मग चाळीसही मतदारसंघांतून प्रत्येकी दोनशे ते तीनशे कार्यकर्ते दुचाक्या घेऊन पणजीत येतील व पर्रिकर यांचा नऊ हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र यानंतर गोव्यासह राष्ट्रीय स्तरावरूनही वेगळी प्रतिक्रिया येऊ लागली. सैनिक प्रचंड त्याग करत असताना व अनेकांना सीमेवर वीरमरणही येत असताना अशा प्रकारे संरक्षण मंत्र्याचा सत्कार करण्याची गरज आहे का असा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केला होता. सरकारचा घटक असलेल्या म.गो. पक्षाचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही पर्रिकर यांच्या सत्काराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोशल साईटवरून टीकेची झोड उठली होती.
 
दरम्यान, भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे व खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांची सोमवारी येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. आम्ही र्पीकर यांचा सत्कार करण्याची योजना आखली नव्हती, आम्ही अभिनंदन करावे असे ठरविले होते. सैनिकांचेच अभिनंदन आम्ही करणार होतो, असा दावा सावईकर यांनी केला. पर्रिकर हे दिल्लीतील काही बैठकांमुळे व्यस्त असल्याने ते आज मंगळवारी गोव्यात दाखल होऊ शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही आज कोणताही कार्यक्रम करणार नाही. दुस:यावेळी कधी कार्यक्रम करायचा ते अजून ठरलेले नाही पण नंतर तारीख जाहीर केली जाईल.
 
भाजपचे संपर्क अभियान-
एकाबाजूने भाषा सुरक्षा मंचचा गोवा सुरक्षा मंच हा राजकीय पक्ष सक्रिय झाल्यानंतर दुस:याबाजूने भाजपनेही आपली रणनीती आखली आहे. भाजपने आपल्या कार्यकत्र्याना अधिक सक्रिय केले आहे. येत्या 8 रोजी म्हापशात भाजपची उत्तर गोवा जिल्हा कार्यकारिणी व 9 रोजी मडगाव येथे दक्षिण गोवा जिल्हा कार्यकारिणी बैठक होईल. त्या बैठकांमध्ये लोकसंपर्क अभियानाचा तपशील निश्चित केला जाईल. दि. 16 ते 29 र्पयत लोकसंपर्क अभियान राबविले जाणार आहे. भाजपचे सगळे आमदार, मंत्री, खासदार, पदाधिकारी प्रत्येक गावात जाऊन लोकांशी चर्चा करतील. सरकारच्या विविध योजनांमध्ये आणखी काय बदल करणो अपेक्षित आहे हेही जाणून घेतील. तत्पूर्वी दि. 12 पासून चार दिवस सर्व मतदारसंघांमध्ये भाजपच्या मंडळ समित्यांच्या बैठका होणार आहेत. नुकतीच भाजपच्या सुमारे साडेसोळा हजार कार्यकत्र्यानी 168 ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: ... so Manohar Parrikar's felicitation program canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.