... तर पंतप्रधानांच्या सभेसाठी बसेस देण्यावर खासगी बसमालकांनी विचार करावा : सुदीप ताम्हणकर
By पूजा प्रभूगावकर | Published: February 2, 2024 02:12 PM2024-02-02T14:12:36+5:302024-02-02T14:13:10+5:30
खासगी बसमालकांना त्यांच्याच हक्काचे पैसे देण्यास सरकार रडवत आहे. त्यामुळे वारंवार आम्हाला न्यायालयात जावे लागत असल्याची टीका त्यांनी केली.
पणजी: खासगी बसमालकांना २०१८ पासूनची प्रलंबित इंधन सब्सिडी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भाजप सरकारला ६ रोजी मडगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी कार्यकर्त्यांची वाहतूक करण्यासाठी बसेस देण्यावर बसमालकांनी विचार करावा असे आवाहन खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
खासगी बसमालकांना त्यांच्याच हक्काचे पैसे देण्यास सरकार रडवत आहे. त्यामुळे वारंवार आम्हाला न्यायालयात जावे लागत असल्याची टीका त्यांनी केली.
ताम्हणकर म्हणाले, की गोव्यात १४६० खासगी बसेस आहेत. त्यापैकी ७५० बसेस कोव्हिडकाळा पासून या बसेस बंद आहेत. तर २०१८ पासून खासगी बसमालकांना इंधन सब्सिडीची रक्कमही सरकारने जारी केलेली नाही. कदंब महामंडळाने पास योजना सुरु केल्याने त्याचा फटका खासगी बसमालकांना बसू लागल्याने सरकारने त्यांच्यासाठी इंधन सब्सिडी सुरु केली होती. मात्र आता या योजनेचीही रक्कमही मिळत नाही. यासाठी अनेकदा सरकारला निवेदने जारी केली. परंतु त्याकडे दुर्लक्षच झाल्याचा आरोप त्यांनी केला.