Sonali Phogat: 'मी कर्लिसचा मालक नाहीच'; सोनाली फोगाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:48 AM2022-08-29T10:48:04+5:302022-08-29T10:49:41+5:30

मांद्रेकर हा हणजूण येथीलच असून तो अंमली पदार्थाच्या व्यवहारात असल्याची चर्चा होती.

Sonali Phogat murder case is likely to take a different turn | Sonali Phogat: 'मी कर्लिसचा मालक नाहीच'; सोनाली फोगाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता 

Sonali Phogat: 'मी कर्लिसचा मालक नाहीच'; सोनाली फोगाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता 

Next

पणजी: अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरणात पोलिसांनी पाचवा संशयित जेरबंद केला असून रविवारी रामदास मांद्रेकर याला अटक करण्यात आली. त्यानेच रुमबॉय दत्तप्रसाद गावकर याला ड्रग्स पुरविले होते असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

मांद्रेकर हा हणजूण येथीलच असून तो अंमली पदार्थाच्या व्यवहारात असल्याची चर्चा होती. परंतु कधी पोलिसांच्या रेकॉर्डवर आला नव्हता आणि पकडलाही गेला नव्हता. दरम्यान, अमली पदार्थ व्यवसायातील मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. रविवारी अटक केलेला संशयित रामदासने ज्या ड्रग पेडलरकडून अमली पदार्थ घेतला, तो या व्यवसायातील मोठा मासा आहे. त्याला लवकरच पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता आहे. ही बडी व्यक्ती शापोरा येथील असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, ज्या क्लबमध्ये हा प्रकार घडला होता, त्या कलिस क्लबचा मालक एडवीन नूनीसने अटकेनंतर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीत त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. नुनीसला आणि रुमबॉय दत्तप्रसादलाही म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. दरम्यान, नुनीसचा अर्ज तांत्रिक कारणामुळे फेटाळला गेला. जामिनासाठी त्याच्यावतीने आज, सोमवारी पुन्हा अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे अॅड. राजू पोवळेकर यांनी सांगितले.

'कर्लिस'चा मालक वेगळा असल्याचा दावा-

ज्या कलिस क्लबमध्ये सोनाली फोगट प्रकरण घडले, तो क्लब आपल्या मालकीचा नसल्याचा दावा एडविन नुनीस याच्या वकिलाने न्यायालयात केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुनीसच्या वकिलांनी न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, कलिस क्लब हा नुनीस याचा असल्याचा दावा कळंगूट पोलिसांनी केला आहे, त्याला काहीच पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत, तो क्लबचा केअर टेकर आहे. ज्या पॉलिथिन बॅगमध्ये मेथाफेटामाइन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला, त्याचे बॅगसह वजन करण्यात आले आणि २० ग्रॅम मेथाफेटामाइन सापडल्याचा दावा करण्यात आला. हा दावाही चुकीचा असल्याचे किलांनी सांगितले. बॅगसह अमली पदार्थांचे वजन करता येत नाही. त्यामुळे या प्रकरणी एनडीपीएस कायदा लागू होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

'कनेक्शन'चा शोध सुरु-

या प्रकरणात आतापर्यंत ड्रग्स पुरविणाऱ्या दोघांना अटक झाली आहे. पोलीस यातील साखळी उलगडत आहेत. सुधीर सांगवानला ड्रग्स पुरविले रुमबॉय दत्तप्रसाद गावकरने आणि दत्तप्रसादला ड्रग्स मिळाले रामदास मांद्रेकरकडून. आता रामदासने ड्रग्स कोणाकडून घेतले याचा शोध पोलीस घेत आहेत. रामदासची कोठडीत चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळाली असून या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होईल, करण्याचा मास्टरप्लॅन तयार अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Sonali Phogat murder case is likely to take a different turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.