वारसा स्थळांच्या संर्वधनासाठी लवकरच धोरण - मंत्री सुभाष फळदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 06:12 PM2023-07-28T18:12:02+5:302023-07-28T18:12:11+5:30
वारसा स्थळे ही आमची दायज आहे. आमचा इतिहास आहे. तो पुढील पिढीला कळावा यासाठी त्यांचे संर्वधन जतन गरजेचे आहे.
नारायण गावस
पणजी: गोव्यात पुढच्या वर्षी नवीन धोरण आणून सर्व वारसा स्थळांचे संर्वधन आणि जतन केले जाणार आहे. यासाठी सरकार तज्ञांची समिती नेमून सर्व वारसा स्थळांचे तसेच ऐतिहासिक स्थळांची पाहणी करणार आहे. असे पुरातन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यात वारसा स्थळांच्या संर्वधनासाठी नवीन धोरण करण्यासाठी खासगी ठराव अधिवेशनात मांडला हाेता. मंत्री फळदेसाई यांच्या आश्वसनाने हा ठराव मागे घेण्यात आला.
वारसा स्थळे ही आमची दायज आहे. आमचा इतिहास आहे. तो पुढील पिढीला कळावा यासाठी त्यांचे संर्वधन जतन गरजेचे आहे. तसेच जी मंदिरे तसेच अन्य स्थळे वारसा स्थळात समावेश झाला नाही त्यांना समाविष्ट करुन धोरणात समावून घेतले जाणार आहे. या धोरणामध्ये राज्यातील बहुतांष स्थळांचा समावेश असणार आहे. एकूण या वारसा स्थळांचे चित्रफीतही काढली जाणार आहे. यासाठी खात्याकडून तयारी सुरु आहे, असे यावेळी मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
पुरात खात्यातर्फेआम्ही राज्यातील जी स्थळे नोटीफाय केली नाही त्यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच जी स्थळे यात मंदिरे व वारसा स्थळे येत आहे त्यांचे जतन केले जाणार आहे. तसेच त्यांचा योग्य अभ्यास करुन भविष्यात याचा लाभ येणाऱ्या पिढीला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार. तसेच हे सर्व डिजीटलाईज केले जाणार आहे. त्याच प्रमाणे जे लाेक आपली जुन्या घरांमध्ये हेरिटेज पर्यटन करु इच्छतात त्यांनाही योग्य ती संधी दिली जाणार आहे, असे यावेळी मंत्री फळदेसाई म्हणाले.