लोकसभा निवडणूकीत दक्षिण गोवा भाजप उमेदवार अभूतपूर्व आघाडीने जिंकणार: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर
By पंकज शेट्ये | Published: April 14, 2023 06:15 PM2023-04-14T18:15:45+5:302023-04-14T18:22:02+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ एप्रिल रोजी गोव्यात येऊन २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची दक्षिण गोव्यातून भव्य स्वरुपात तयारीची सुरवात करणार आहेत.
वास्को: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १६ एप्रिल रोजी गोव्यात येऊन २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची दक्षिण गोव्यातून भव्य स्वरुपात तयारीची सुरवात करणार आहेत. २०२४ सालात होणाºया लोकसभा निवडणूकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपचे उमेदवार जिकंणार असून दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवाराला तर अभूतपूर्व अशा आघाडीने विजय मिळणार आहे. मुरगाव मतदारसंघातून लोकसभा निवडणूकीला जेवढे मतदान होणार त्यातील ८० टक्के मतदान दक्षिण गोवा भाजप उमेदवाराला होणार असल्याचा विश्वास मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या निमित्ताने बायणा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रम आणि मिरवणूकीवेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांच्याबरोबर मुरगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, मुरगावच्या नगरसेविका श्रद्धा आमोणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार आमोणकर आणि उपस्थित मान्यवरांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने मुरगाव मतदारसंघातील सर्व ३० बुथवर भाजपतर्फे जयंती साजरी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याची माहीती आमदार आमोकर यांनी दिली. तसेच मुरगाव मतदारसंघातील भाजप कार्यालयात आणि अन्य ठीकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचे सांगितले.
१६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गोव्यात येत असून त्या दिवशी त्यांची दक्षिण गोव्यात जाहीरसभा होणार असल्याची माहीती आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली. ते त्यादिवशी २०२४ सालात होणाºया लोकसभा निवडणूकीचा गोव्यात दक्षिण गोव्यातून प्रचाराला सुरवात करणार असल्याची माहीती दिली. त्या जाहीरसभेला दक्षिण गोव्यातून अभूतपूर्व अशी लोकांची उपस्थिती असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातून १ हजार लोकांची उपस्थिती त्या सभेला असावी असे लक्ष आहे. मुरगाव मतदारसंघातून त्या सभेला १५०० हून जास्त लोकांची उपस्थिती असणार असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला.
एका वर्षात मुरगाव मतदारसंघात भाजप सरकारच्या अंतर्गत उत्तम विकास झालेला असून लोकसभा निवडणूकीत मुरगाव मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठींबा भाजप उमेदवारालाच असणार. २०२४ सालात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत गोव्यातील उत्तर आणि दक्षिण अशी दोन्ही जागा भाजपच जिंकणार असून दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवाराला तर अभूतपूर्व मतांच्या आघाडीने विजय मिळणार असल्याचा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला. दक्षिण गोव्यातील मुरगाव मतदारसंघातून तर जेवढी मते लोकसभा निवडणूकीला पडणार त्यापैंकी ८० टक्के मते भाजप उमेदवाराच्या बाजूने असणार असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला.