मडगावसह दक्षिण गोव्यात सर्वाधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 04:54 PM2024-06-10T16:54:52+5:302024-06-10T16:55:34+5:30
आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस काणकोण केंद्रात नोंद झाला आहे तर सर्वात कमी पाऊस पेडणे केंद्रावर नोंद झाला आहे.
नारायण गावस -
पणजी: शनिवार आणि रविवार राज्यात पावसाने झाेडपल्यानंतर सोमवारी काही प्रमाणात विसावा मिळाला. यंदा उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातील केंद्रामध्ये जास्त पावसाची नाेंद झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस काणकोण केंद्रात नोंद झाला आहे तर सर्वात कमी पाऊस पेडणे केंद्रावर नोंद झाला आहे.
काणकोण, मडगावात १४ इंच पाऊस -
राज्यात १ जून ते आतापर्यंत झालेल्या पावसामध्ये काणकोणात १४.७ इंच पावसाची नाेंद झाली आहे. ही राज्यातील इतर केंद्रापेक्षा सर्वाधिक जास्त आहे . तर त्याच्यानंतर मडगावात १४.६ इंच पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. तर केपेत १३.७ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राजधानीत १० इंच पाऊस -
राजधानी पणजीत आतापर्यंत १०.१ इंच पावसाची नोंद झाली आहे तर आतापर्यंत सर्वात कमी पेडणे केंद्रावर नोंद करण्यात आली आहे पेडणे फक़्त ६ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर फोंडा ६.७ इंच व वाळपईत ८ इंच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक जास्त पाऊस पणजी केंद्रावर नोंद करण्यात आला आहे. पणजीत गेल्या २४ तासांत ३.६ इंच पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी पावसाने काही प्रमाणात विसावा घेतल्याने लाेकांना आपली काही प्रमाणात कामे करायला मिळाली. विसावा घेतला तरी दिवसभर दमट व ढगाळ वातावरण होते. तर काही भागात पावसाच्या सरी पडल्या. हवामान खात्याने उद्या पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केल्याने आजही पावसाची शक्यता आहे.
२४ तासांत झालेला पाऊस इंचात
पणजी :३.६
केपे: ३.५
ओल्ड गोवा: ३.१
सांगे: २.८
मडगाव: २.६
वाळपई:२.५
काणकोण: २.४
मुरगाव:२.४
दाबोळी: २
म्हापसा: १.८
फोंडा: १.४
साखळी: १.२
१ जून ते आतापर्यंत पाऊस इंचात
पणजी :१०.१
केपे: १३.७
ओल्ड गोवा: १०.३
सांगे: १३.७
मडगाव: १४.६
वाळपई: ८
काणकोण: १४.७
मुरगाव: १०
दाबोळी: ९.८
म्हापसा: ८.४
फोंडा: ६.७
साखळी: १३.७
पडणे: ६