पल्लवी धेंपेने घेतले श्रीमहालक्ष्मीचे दर्शन; पणजीच्या ग्रामदेवतेचा घेतला आशिर्वाद

By पूजा प्रभूगावकर | Published: March 25, 2024 02:01 PM2024-03-25T14:01:18+5:302024-03-25T14:02:45+5:30

त्यांचे पती तथा उद्योजक श्रीनिवास धेंपे, पणजी शिमगोत्सव समितीचे मंगलदास नाईक व अन्य उपस्थित होते.

south goa lok sabha election 2024 candidate pallavi dempo took darshan of sri mahalakshmi in panaji | पल्लवी धेंपेने घेतले श्रीमहालक्ष्मीचे दर्शन; पणजीच्या ग्रामदेवतेचा घेतला आशिर्वाद

पल्लवी धेंपेने घेतले श्रीमहालक्ष्मीचे दर्शन; पणजीच्या ग्रामदेवतेचा घेतला आशिर्वाद

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: शिमगोत्सवाला राज्यात सुरुवात झाली असून या निमित सोमवारी सकाळी भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी पणजीच्या श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

यावेळी त्यांचे पती तथा उद्योजक श्रीनिवास धेंपे, पणजी शिमगोत्सव समितीचे मंगलदास नाईक व अन्य उपस्थित होते. पणजीची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा आर्शिवाद घेऊन पल्लवी धेंपे यांनी समस्त लोकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी श्री महालक्ष्मीला नमन करुन पणजीत होळीला सुरुवात होते.

पल्लवी धेंपे यांना लोकसभेची भाजपने दक्षिण गोव्यातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा रविवारी रात्री उशीरा झाली. लोकसभा निवडणूकीसाठी गोवा भाजपने प्रथमच महिला उमेदवाराला तिकिट दिली आहे. तसेच केडरबाहेर उमेवारी देण्याचाही भाजपचा हा तसा पहिलाच निर्णय आहे, त्यामुळे पल्लवी धेंपे यांचे अभिनंदन होत आहे.

Web Title: south goa lok sabha election 2024 candidate pallavi dempo took darshan of sri mahalakshmi in panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.