डेंग्यू मलेरियाच्या नियंत्रणासाठी आराेग्य खात्याचे खास उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:46 PM2024-05-22T14:46:02+5:302024-05-22T14:46:14+5:30
राज्यात मागील वर्षापासून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य खात्याने आतापासून सतर्कता ठेवल.
- नारायण गावस
पणजी: राज्यात यंदाच्या वर्षी डेंग्यू मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी आरोग्य खात्याने आतापासून खास उपक्रम सुरु केले असून अनेक सरकारी खात्यांनाही विविध मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत. आरोग्य खात्याने शिक्षण खाते, बंदर कप्तान खाते गृहनिर्माण वसाहत, कंदब महामंडळ, पंचायत, नगरपालिका अशा विविध खाती महामंडळाना निवेदन पाठवून डेंग्यू मलेरियावर खास काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक सरकारी कार्यालयातून एक नाेडल अधिकारी नेमण्यात आला आहे.
राज्यात मागील वर्षापासून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य खात्याने आतापासून सतर्कता ठेवल. राज्यात मान्सूनपूर्व पावसाळा सुरु झाला आहे. लोकांनी आपल्या परसबागेत बागायतींमध्ये पाणी साचवू देऊ नये यासाठी आरोग्य खात्याने आवाहन केले आहे. तसेच विविध जनजागृती कार्यक्रम केले जात आहेत. प्रत्येक वर्षी मडगाव, पणजी, म्हापसा, वास्काे या सारख्या प्रमुख शहरात
डेंग्यूचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडतात. बहुतांश रुग्ण हे झाेपडपट्टी परिसरात सापडतात. या लोकांमध्ये जागृतेचा अभाव असतो. पण यंदा आरोग्य खात्याने पंचायत तसेच नगरपाालिका यांना सोबत एकत्र येऊन जनजागृतीवर भर दिली आहे. त्याचप्रमाणे यंदा खास धार्मिक संस्था मार्फत जागृती केली जात आहे.
आराेग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या आरोग्य खात्याचे कर्मचारी प्रत्येक घराघरात जाऊन डेंग्यू मलेरिया विषयी जागृती करु शकत नाही त्यामुळे पंचायत नगरपालिकांसोबत एकत्र येऊन जागृती केली जात आहे. तसेच आता चर्च, मशिद मंदिर या धार्मिक संस्थामार्फत जागृती केली जात आहे तसेच. अनेक सरकारी खात्यांनाही आम्ही डेंग्यू मलेरिया विषयी जागृती करण्यासाठी निवेदन दिले आहे.