ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांचे विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 08:12 PM2018-12-19T20:12:21+5:302018-12-19T20:12:37+5:30

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी गोवा सरकार विविध उपक्रम राबवित असून, पोलिसांनाही अशा नागरिकांची विशेषत: घरात एकाकी राहण्याची तयार करण्यास सांगितले आहे.

Special attention of police to senior citizens | ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांचे विशेष लक्ष

ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांचे विशेष लक्ष

Next

मडगाव - ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी गोवा सरकार विविध उपक्रम राबवित असून, पोलिसांनाही अशा नागरिकांची विशेषतता घरात एकाकी राहण्याची तयार करण्यास सांगितले आहे. राज्यातील दक्षिण गोवा पोलिसांनी या उपक्रमाला सुरुवात करताना ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार केली जात असून, आतार्पयत 1799 नागरिकांचे अर्ज भरण्यात आले आहे. बीट पोलिसांना अशा ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून, दुचाकीवरुन गस्त घालणारे बीट पोलीस अशा नागरिकांची विचारपूस करुन, त्यांच्या तब्येतीविषयी तसेच त्यांच्या सुरक्षतेविषयी माहिती जाणून घेत आहे.
दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी आपण जिल्हयातील सर्व पोलीस निरीक्षकांना ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षतेविषयी काळजी घेण्यास सांगितल्या स्पष्ट केले. मडगाव पोलीस ठाण्याच्या कक्षेत एकूण 179 ज्येष्ठ नागरिकांची फॉर्मस भरण्यात आली आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्यात  162, कोलवा  पोलीस सर्वात जास्त म्हणजे 333, कुंकळळी 225, फातोर्डा 133,काणकोण 124,केपे 121,कुडचडे 100 व सांगे पोलीस ठाण्यात 84 अर्ज भरण्यात आले आहे.
वास्को पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांवी 97 अर्ज भरले आहे, वेर्णा 120,मुरगाव 25, फोंडा 69 तर कुळे पोलीस ठाण्यात हा आकडा 84 इतका आहे, पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाउन त्यांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतात, शाररिक सुरक्षा तसेच घरगुती प्रश्नावरही या ज्येष्ठ नागरिकांना पोलीस मदत करीत असतात अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली.
फातोर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या पोलीस ठाण्याच्या अख्यत्यारीत आमची टीम ज्येष्ठ नागरिकांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देणो हे पोलिसांचे कर्तव्य असून, आम्ही आमची डयुटी करीत असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: Special attention of police to senior citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा