उन्हाळी हंगामासाठी धावणार विशेष ट्रेन, मध्य-कोकण रेल्वेची जय्यत तयारी; पाहा, सविस्तर तपशील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 08:15 IST2025-03-22T08:15:13+5:302025-03-22T08:15:13+5:30
उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळी हंगामासाठी धावणार विशेष ट्रेन, मध्य-कोकण रेल्वेची जय्यत तयारी; पाहा, सविस्तर तपशील
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी करमळी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी मुंबई सीएसएमटीहून ००.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी १३.३० वाजता करमळीला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०११५२ करमळी मुंबई सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी करमळीहून १४.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही २२ डब्यांची गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकावर थांबेल. या गाड्यांना एकूण २२ कोच : टू टायर एसी-०१ कोच, श्री टायर एसी-०५ कोच, स्लीपर-१० कोच, जनरल-०४ कोच, एसएलआर-०२ आहेत.
गाडी क्र. ०११२९ लोकमान्य टिळक (टी) -करमळी स्पेशल साप्ताहिक १० एप्रिल ते ०५ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता करमळीला पोहोचेल. गाडी क्र. ०११३० करमळी लोकमान्य टिळक (टी) स्पेशल साप्ताहिक ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर शुक्रवारी करमळीहून दुपारी २.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ४.०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही १९ डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकांवर थांबेल. या गाड्यांना एकूण १९ एलएचबी कोच फर्स्ट एसी-०१ कोच टायर एसी -०२ कोच, थ्री टायर एसी-०६ कोच, स्लीपर-०८ कोच, जनरेटर कार-०२.३ आहे.
गाडी क्र. ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) तिरुवनंतपुरम नॉर्थ स्पेशल साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ३ एप्रिल ते २९ मेपर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता तिरुवनंतपुरम नॉर्थला पोहोचेल. गाडी क्र. ०१०६४ तिरुवनंतपुरम नॉर्थ लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ५ एप्रिल ते ३१ मेपर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम नॉर्थ येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.