गणेश चतुर्थीनिमित्त कोंकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 08:15 AM2024-07-25T08:15:05+5:302024-07-25T08:16:12+5:30
विविध मार्गावर विशेष प्रवासी गाड्या धावणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गणेश चतुर्थीसाठी मुंबई, तसेच इतर मार्गावरून गावाला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी कोंकण रेल्वेने खास प्रवासी गाड्यांची सोय केली आहे. यावर्षी गणेश चतुर्थी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असल्याने दि. १ ते १८ सप्टेंबर या काळात विविध मार्गावर विशेष प्रवासी गाड्या धावणार आहेत.
दि. १ ते १८ सप्टेंबरपर्यंत दररोज धावणाऱ्या गाड्या ट्रेन क्रमांक ०११५१ मुंबई ते सावंतवाडी स्पेशल व ०११५२ मुंबई सीएसटीवरून दररोज १२:२० वाजता सुटणार आहे, तर सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी दुपारी २:२० वा. पोहोचणार आहे. रेल्वे क्रमांक ०११५२ दररोज सावंतवाडीहून दुपारी ३:१० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०११५३ व ०११५४ मुंबई ते रत्नागिरी दररोज धावणार आहे. ०११५३ ही गाडी दररोज मुंबईहून दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल व रत्नागिरीला त्याच दिवशी रात्री ८:१० वाजता पोहोचेल. ०११५४ ही रेल्वे गाडी रत्नागिरीहून पहाटे ४ वाजता सुटेल व मुंबई सीएसएमटीला त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता पोहोचेल.
रेल्वे क्रमांक ०११६७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ दररोज रात्री ९ वाजता सुटून कुडाळला दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता पोहोचेल. ०११६८ ही रेल्वे दररोज दुपारी १२ वाजता सुटेल व लोकमान्य टर्मिनस येथे दुपारी १२:४० वाजता पोहोचेल.
रेल्वे क्रमांक ०११७१ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ८:२० वाजता सुटेल व सावंतवाडी येथे रात्री ९ वाजता पोहोचेल. ०११७२ सावंतवाडीहून रात्री १०:२० वाजता सुटेल व लोकमान्य टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०:४० वाजता पोहोचेल. ०११५५ ही रेल्वे दिवा जंक्शनवरून सकाळी ७:१५ वाजता सुटेल व चिपळूणला दुपारी २ वा. पोहोचेल. ०११५६ ही रेल्वे चिपळूणहून दुपारी ३:३० वाजता सुटेल व दिवा जंक्शनला रात्री १०:५० वा. पोहोचेल.
०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ परत रेल्वे क्रमांक ०११६५ ही रेल्वे सप्टेंबरच्या ३, १० आणि १७ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल व त्याच दिवशी कुडाळला १२:३० वाजता पोहोचेल. ०११६६ ही रेल्वे ३, १० व १७ सप्टेंबर रोजी कुडाळहून सायंकाळी ४:३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी पहाटे ४:५० वाजता पोहोचेल.
०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनसहून २ ते १८ सप्टेंबरपर्यंत दर सोमवार, बुधवार व शनिवारी मध्यरात्री ०:४५ वा. सुटेल व कुडाळला त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. ०११८६ ही रेल्वे दर सोमवार, बुधवार व शनिवारी १६:३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ४:५० वाजता पोहोचेल. या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करावे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.