चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश
By पूजा प्रभूगावकर | Published: May 24, 2024 04:53 PM2024-05-24T16:53:13+5:302024-05-24T16:54:33+5:30
या जलमार्गावर सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांची गर्दी होत असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: चोडण ते साल्वादोर द मुंद दरम्यान होणाऱ्या पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी अधिकाऱ्यांना दिले. या पुलावर २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
चोडण पुलाची मागणी ही तशी बरीच जुनी आहे. सध्या पणजीहून चोडणला जाण्यासाठी रायबंदर येथून फेरीबोट सेवा आहे. या मार्गावर चार फेरीबोटी आहेत. मात्र या जलमार्गावर सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांची गर्दी होत असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. या सर्वावर पर्याय म्हणून सरकारने चोडण ते साल्वादोर द मुंद दरम्यान पुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलामुळे पर्वरीच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही त्याचा मोठा फायदा होईल.
या बैठकीला महसूल मंत्री रोहन खवटे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट ,उत्तर गोवा जिल्हाधिकारी, महसूल सचिव, चोडणचे नागरिक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता, अधिकारी उपस्थित होते.