क्रीडा खात्याचे संचालकपद पुन्हा प्रभुदेसार्इंकडे

By Admin | Published: April 17, 2015 02:06 AM2015-04-17T02:06:02+5:302015-04-17T02:06:14+5:30

पणजी : सरकारने गुरुवारी एका आदेशाद्वारे अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. क्रीडा खात्याचे संचालक वाय. बी. तावडे यांची बदली करून

Sports director re-elected to Prabhudesai | क्रीडा खात्याचे संचालकपद पुन्हा प्रभुदेसार्इंकडे

क्रीडा खात्याचे संचालकपद पुन्हा प्रभुदेसार्इंकडे

googlenewsNext

पणजी : सरकारने गुरुवारी एका आदेशाद्वारे अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. क्रीडा खात्याचे संचालक वाय. बी. तावडे यांची बदली करून त्याजागी पुन्हा व्ही. एम. प्रभुदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभुदेसाई यांच्याकडे युवा व्यवहार व शारीरिक शिक्षण खात्याचे उपसंचालकपद होते. त्यांची नियुक्ती आता पुन्हा क्रीडा संचालक म्हणून झाली आहे. शिवाय युवा व्यवहार खात्याच्या उपसंचालकपदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे असेल. तावडे यांची नियुक्ती दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त संचालकपदी करण्यात आली आहे. पालिका प्रशासन खात्याच्या संचालक पदावरून वेनान्सियो फुर्तादो यांची बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती उद्योग खात्याच्या संचालकपदी झाली आहे. तसेच भू-नोंदणी खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे सोपविला आहे. पालिका प्रशासन संचालक व ‘सुडा’चे सदस्य सचिवपद या दोन पदांचा अतिरिक्त ताबा एल्वीस गोम्स यांच्याकडे देण्यात आला आहे. उद्योग खात्याचे सरव्यवस्थापक दीपक देसाई यांची बदली व नियुक्ती शिष्टाचार खात्याचे संयुक्त सचिव म्हणून झाली आहे. कला अकादमीच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे सोपविला आहे. दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर मोरजकर यांच्याकडे उद्योग खात्याचे सरव्यवस्थापकपद दिले गेले आहे. उपमुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव अँथनी डिसोझा यांच्याकडे आरोग्य खात्याचे संयुक्त सचिवपद सोपविले गेले आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Sports director re-elected to Prabhudesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.