पाच विद्यार्थ्यांना भोवले 'स्प्रे' प्रकरण; एका महिन्यासाठी केले निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:06 PM2023-08-19T12:06:55+5:302023-08-19T12:07:21+5:30

शिक्षण उपसंचालकांसह तानावडेंची विद्यालयाला भेट

spray case involving five students suspended for one month in shantadurga school goa | पाच विद्यार्थ्यांना भोवले 'स्प्रे' प्रकरण; एका महिन्यासाठी केले निलंबन

पाच विद्यार्थ्यांना भोवले 'स्प्रे' प्रकरण; एका महिन्यासाठी केले निलंबन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली राज्यभरात खळबळ उडवून : देणाऱ्या डिचोली येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातील 'स्प्रे' प्रकरणी प्राथमिक चौकशीत पाच विद्यार्थी दोषी आढळले आहेत. त्यांना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. या पाचजणांत एका विद्यार्थीनीचाही समावेश आहे.

गुरुवारी वर्ग सुरू असतानाच अचानक बारा मुलांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. तातडीने त्यांना डिचोली व म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अकरा विद्यार्थ्यांना उपचार करून घरी पाठवले. त्यातील एका विद्यार्थिनीला रात्री त्रास झाल्याने तिला बांबोळी येथे उपचारार्थ दखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत व्यवस्थापनाला पत्र लिहून योग्य पध्दतीने चौकशी करण्याची सूचना दिली होती.

शुक्रवारी सकाळी शिक्षण खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर, शालेय व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी, पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त बैठक झाली. त्यानंतर मनोज सावईकर यांनी ज्या वर्गात घटना घडली त्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विविध शिक्षक व इतरांशी चर्चा केली. या बैठकीनंतर मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पाच विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे सांगितले.

राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी विद्यालयास भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. स्प्रेच्या वापरामुळे बारा विद्यार्थिनींना इस्पितळात दखल करण्यात आले. परंतु, तो पेपर स्पे नसून वेब स्प्रे किंवा अन्य काही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी व्यवस्थापन समितीला शिक्षण खात्याच्या अधिकायांनी बोलावून घेतले होते एकूणच प्रकारांची रितसर चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिक्षण खात्यास आदेश दिले.

कमिटी स्थापन

शिक्षण खात्याच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली असून या संबंधात सर्व ते पुरावे व इतर बाबतीत हि समिती तपास करून आपला अहवाल सादर करणार आहे.

पालकांची धाव

विद्यालयातील प्रकारानंतर पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी पालक शिक्षक संघाची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, पालकांनी काल विद्यालयात धडक देत असा प्रकार पुन्हा घडून नये यासाठी व्यवस्थापनाने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडली ई-सिगरेट

शांतादुर्गा विद्यालयातील प्रकरणाची व्यवस्थापानाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात पाच विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विद्यालयात चौकशीच्या फेऱ्या सुरु असतानाच ज्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले त्यातील एकाच्या बॅगमध्ये ई-सिगरेट आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संस्थेच्या इमारतीत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. मात्र आम्ही काल आणखी २२ नवे कॅमेरा लावले आहेत. या प्रकरणाची रितसर चौकशी करण्यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. या संदर्भात व्यवस्थापन संबंधित विद्यार्थ्यांविरोधात कडक कारवाई करणार आहे. - विजय सरदेसाई, अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ

काल सकाळी खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर यांनी विद्यालयाला भेट देऊन काही माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी शिक्षण संस्थेचे चेअरमन शिष्टमंडळासह मला भेटले व अंतरिम अहवाल दिलेला आहे. काही विद्यार्थीनी अद्याप इस्पितळात आहेत, त्यामुळे त्यांची जबानी घेता आलेली नाही. एक विद्यार्थीनी काल वर्गात आली होती, परंतु जबानी देण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्यामुळे अंतिम अहवाल
सादर करण्यासाठी व्यवस्थापनाने मंगळवारपर्यंत मुदत मागितली आहे. - शैलेश झिंगडे, संचालक, शिक्षण खाते

 

Web Title: spray case involving five students suspended for one month in shantadurga school goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.