किनाऱ्यावर जीव वाचवण्यासाठी आता प्रशिक्षित श्वानांचे पॉ स्क्वॉड
By काशिराम म्हांबरे | Published: April 29, 2023 03:10 PM2023-04-29T15:10:20+5:302023-04-29T15:10:58+5:30
स्विम विथ लाइफ सेव्हर्सहा उपक्रम मार्च २०२१ मध्ये दृष्टी मरीनने गोव्यात सुरू केलेला.
म्हापसा: दृष्टीने आता एक पाऊल पुढे टाकत किनांºयावर बुडणाºयांचा जीव वाचविण्यासाठी प्रशिक्षित श्वानांचे पॉ स्क्वॉड तयार केले आहे. येत्या मॉन्सूननंतर या श्वानांचा वापर बचाव व सुरक्षा कार्यात जीवरक्षकांना मदत करण्यासाठी केला जाईल. शुक्रवारी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत कांदोळी किनार्यावर याविषयी माहितीसोबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
तसेच स्विम विथ लाइफ सेव्हर्सहा उपक्रम मार्च २०२१ मध्ये दृष्टी मरीनने गोव्यात सुरू केलेला. समुद्रात पोहण्याबद्दल उपयुक्त टिप्स देण्यासाठी हा कार्यक्रम होता. समुद्रस्थळी उभारलेल्या झेंड्याविषयी माहिती किंवा सूचना फलकांचे महत्त्व काय, हे या उपक्रमांतून सांगितले जाते. तसेच ६० मिनिटांच्या कार्यक्रमात ऐच्छिक सहभाग घेणार्यांना मार्गदर्शित पोहण्याचे सत्र दिले जाते. याशिवाय पोहण्यावेळी कुठली काळजी घेणे याबाबत जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे. मिरामार, बाणावली, कोलवा व कांदोळी या समुद्रकिनाºयांवर हा उपक्रम नव्याने शुक्रवारपासून पुनरुज्जीवित करण्यात आला.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित आॅरस नावाचा रोबोट गोव्यातील किनाºयावर याआधीच तैनात केलेत. हा रोबोट जीवरक्षकांप्रमाणेच लोकांचा जीव वाचवण्यास मदत करतो. आॅरस हा एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा सेल्फ ड्रायव्हिंग रोबोट. हा रोबोट एआय या सिस्टीमवर आधारित आहे. आॅरस हा किनाºयावर गस्त घालून भरतीच्या वेळी पर्यटकांना सतर्क करतो व जीवरक्षकांना मदत करतो. समुद्रकिनाºयांवर पाळत ठेवण्यास आणि गर्दीचे नियोजन करण्यास या रोबोटची मदत घेतली जाते.
दृष्टी मरीनने समुद्रकिनाºयावर श्वानचा वापर जीवरक्षक म्हणून करण्याचे पाऊल उचलले आहे. आशियातील अशा प्रकाराच्या उपक्रमाची ही पहिलीच अंमलबजावणी गोव्यातून होत आहे. सध्या या जीवरक्षक श्वानांच्या पथकास प्रशिक्षण दिले जात आहे. अकरा श्वानांचा यात समाविष्ट आहे. हे पथक समुद्रात अडकलेल्यांना शोधणे, विशेषत: खडकाळ भागात बचाव कार्यात या श्वानांची भूमिका महत्त्वाची राहिल. श्वान पथकात अधिकतर भटक्या कुंत्र्यांचा समाविष्ट केलाय. हे पॉ स्क्वॉड सध्या प्रशिक्षणाधीन असून, हे प्रथम उच्च घनतेच्या किनाºयावर व नंतर कमी गर्दीच्या ठिकाणी तैनात केले जातील. हे श्वान पथक अर्जुन शॉन मैत्रा या तज्ज्ञ डॉग ट्रेनरच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत आहे.