रसिकांना वेडावून टाकणारा श्रीधर कालवश; देहदानाच्या इच्छेमुळे पार्थिव गोमेकॉला दान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 05:16 PM2018-02-07T17:16:14+5:302018-02-07T17:16:24+5:30

 ‘निळ रंगान रंगला’, यासारखी गीते लिहून कोंकणी गीत रसिकांना अगदी वेडावून सोडलेले गीतकार आणि गोव्यातील कित्येक चळवळीत आघाडीवर राहून काम करणारे कार्यकर्ते श्रीधर कामत यांचे बुधवारी दुपारी निधन झाले.  निधनसमयी त्यांचे वय 54 होते.

Sridhar Kalwesh wooing fans; Parthiv Gomacola donation due to the will of the body | रसिकांना वेडावून टाकणारा श्रीधर कालवश; देहदानाच्या इच्छेमुळे पार्थिव गोमेकॉला दान

रसिकांना वेडावून टाकणारा श्रीधर कालवश; देहदानाच्या इच्छेमुळे पार्थिव गोमेकॉला दान

Next

मडगाव:  ‘निळ रंगान रंगला’, यासारखी गीते लिहून कोंकणी गीत रसिकांना अगदी वेडावून सोडलेले गीतकार आणि गोव्यातील कित्येक चळवळीत आघाडीवर राहून काम करणारे कार्यकर्ते श्रीधर कामत यांचे बुधवारी दुपारी निधन झाले.  निधनसमयी त्यांचे वय 54 होते.  सावली या मराठी चित्रपटासाठी शंकर महादेवन यांच्या आवाजातून रसिकांसमोर आलेल्या त्यांच्या ‘निळ रंगी रंगला’ या गीताला 2007 चा ‘मटा सन्मान’ पुरस्कार प्राप्त झाला होता. मागचा महिनाभर ते यकृताच्या कॅन्सरशी झुंज देत होते. ही झुंज चालू असतानाच दुपारी 1 वाजता काळाने त्यांच्यावर झडप घातली. कामत यांनी मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने  गुरुवारी त्यांचा मृतदेह गोमेकॉला दान करण्यात येणार आहे.
कामत यांच्यामागे पत्नी अंजली, पुत्र हर्ष व कन्या आश्र्विनी असा परिवार असून त्यांच्या निधनावर सर्व थरातून दु:ख व्यक्त केले जात आहे.
कामत यांचा वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशीही त्यांचा संबंध होता. दक्षिणायन, गोवा बचाव आंदोलन या संस्थांचे ते सक्रीय कार्यकर्ते होते. मडगावच्या रवींद्र भवनचे उपाध्यक्ष म्हणूनही काम करताना त्यांनी आपला ठसा उमटविला होता.
त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, मागील महिन्यांपासून ते आजारी होते.  गेले काही दिवस त्यांची प्रकृती एकदम खालावली होती. आज सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांच्या घोगळ-हाऊसिंग बोर्ड येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर हे पार्थिव गोमेकॉत नेले जाणार आहे. आपल्या मृतदेहाचा वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांचा मृतदेह दान करण्यात येणार आहे. 
विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी आंदोलनासह कित्येक आंदोलनात सक्रीय असलेले कामत हे रस्त्यावर जरी कणखर भासत होते तरी प्रत्यक्षात ते एक हळव्या मनाचे कवी होते. कोंकणीबरोबरच मराठी गीतेही लिहिणारे कामत यांना ‘सावली’ या मराठी चित्रपटासाठी लिहलेल्या ‘निळ रंगी रंगले’ या गीताला 2007 चा ‘मटा सन्मान’ पुरस्कार प्राप्त झाला होता. तर त्यांच्या अलिशा या चित्रपटातील ‘कळी कळी’ या गीतासाठी त्यांना गोवा राज्य पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांची कित्येक गीते शंकर महादेवन व शान यांच्या आवाजातून तरुण पिढीपुढे आल्यानंतर या गीतांनी या पिढीला अक्षरश: भारावून सोडले होते.
शंकर महादेवन यांच्या आवाजातून लोकांर्पयत पोचलेल्या ‘निळ रंगान रंगला’ (कोंकणी गीत) या गीताने कोंकणी संगीताला एक वेगळाच आयाम मिळवून दिला होता. अशोक पत्की यांनी हे गीत संगीतबद्ध केले होते. कामत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना पत्की यांनी श्रीधरच्या या गीतामुळे माङोही आयुष्य समृद्ध झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 
शंकर महादेवन यांच्याच आवाजातील ‘सवकळेच्यो वाटो’ हे गीतही असेच रसिकांनी उचलून घेतले होते. ‘दारात म्हज्या सांज पिशी (गायिका बेला सुलाखे), साळका फुला फुल (गायक केतन भट) यासारख्या गीतांनी कामत यांनी रसिकांना वेडे केले होते. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी एक ग्रेट कवी गेला अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, श्रीधर कामत हे उत्कृष्ट दर्जाचे कवी व गीतकार होते. अभ्यास करुन ते गीते लिहायचे. त्या गीतात भाव असायचा आणि विचारही असायचे. श्रीधर बरोबर मी चार पाच सिनेमात काम केले आहे. तो केवळ चांगला कवी नव्हता तर चांगला व्यक्तीही होता. मी गोव्यात यायचो त्यावेळी त्याची भेट घेतल्याशिवाय जात नसे. मात्र मागच्या चार पाच महिन्यात आमची भेट झाली नाही. चौकशी केली असता, श्रीधर आजारी आहे अशी माहिती मिळाली. आज एकदम ही धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर काही क्षण मी हबकूनच गेलो असे पत्की म्हणाले.
 

Web Title: Sridhar Kalwesh wooing fans; Parthiv Gomacola donation due to the will of the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा